Ipl 2025 Playoffs Qualification Scenario  Saam Tv News
Sports

CSK vs SRH IPL 2025 : MS धोनी आणि काव्या मारनसाठी आज करो या मरो! CSK आणि SRHपैकी जो हरणार त्याला 'गुड बाय'; जाणून घ्या समीकरण

IPI 2025 Playoffs Qualification Scenario : चेन्नई आणि हैदराबाद या दोघांनाही उर्वरित सहा सामने जिंकावे लागतील. पण, आज यापैकी एका संघाचे परतीचे दोर कापले जातील.

Prashant Patil

चेन्नई : आयपीएल २०२५च्या यंदाचा सीजन आता एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. प्लेऑफसाठीची लढाई आता रंजक बनणार आहे. काल गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करल्यामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी नऊ संघांमध्ये लढाई सुरू आहे. पण, आज शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर दुसरा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे.

राजस्थानच्या संघाने आतापासून जरी प्रत्येक सामना जिंकला तरी त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील, तर सध्याच्या गुणतालिकेमध्ये असे सहा संघ आहेत जे १६ किंवा त्याहून अधिक गुणांपर्यंत पोहोचू शकतात. गुजरात टायटन्स, आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सना १६ गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.

मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांना प्रत्येकी तीन सामने जिंकावे लागतील. कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या उर्वरित सहा सामन्यांपैकी पाच विजयांसह १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. हैदराबाद आणि चेन्नईची परिस्थिती राजस्थानसारखीच आहे. आज पराभूत होणारा संघ जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकेल. पण, विजेत्या संघासाठी परतीचे दोर अजूनही शिल्लक असतील.

चेन्नई आणि हैदराबाद या दोघांनाही उर्वरित सहा सामने जिंकावे लागतील. पण, आज यापैकी एका संघाचे परतीचे दोर कापले जातील. आज चेपॉक येथे चेन्नई आणि हैदराबाद एकमेकांसमोर येतील आणि पराभूत संघाचा प्रवास संपेल. विजेत्या संघासाठीही पुढचा रस्ता सोपा नसेल, कारण खराब नेट रन रेट देखील अडचणीचं कारण बनू शकतो. सीएसकेचे आगामी सामने SRH, PBKS, RCB, KKR, RR आणि GT विरुद्ध आहेत. हैदराबादचे आगामी सामने CSK, GT, DC, KKR, RCB आणि LSG विरुद्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा आक्रमक एल्गार

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT