MS Dhoni MI VS CSK X (Twitter)
Sports

MS Dhoni MI VS CSK : चाहत्यांनी वर्षभर प्रतिक्षा केली; मात्र 'ती' गोष्ट करायची धोनीकडून राहूनच गेली, काय घडलं?

MI VS CSK IPL 2025 : चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये चेन्नईने ४ गडी राखत मुंबईचा पराजय केला. पण चेन्नईच्या विजयापेक्षा धोनीच्या एन्ट्रीची जास्त चर्चा झाली.

Yash Shirke

Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंह धोनीची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यामध्ये धोनी शेवटच्या ओव्हरमध्ये खेळायला आला. त्याच्या एन्ट्रीला स्टेडियमभर गाणी वाजायला लागली, चाहत्यांनी जोराजोरात जल्लोष करायला सुरुवात केली. धोनी दोन बॉल खेळला पण त्याने एकही धाव केली नाही. तरीही माहीची बॅटिंग करताना एक झलक दिसली म्हणून त्याचे चाहते खूश झाले.

८ बॉल्सवर ४ धावा शिल्लक असताना एमएस धोनी मैदानामध्ये उतरला. अठराव्या ओव्हरमध्ये ज्या वेळेस नमन धीर गोलंदाजी करत होता, तेव्हा ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रविंद्र जडेजा रनआउट झाला. दीपक चहरच्या वेगवान थ्रोमुळे जडेजा बाद झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करण्यासाठी आला. धोनी आल्यावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

टॉस जिंकून चेन्नईने गोलंदाजी करण्याचे ठरवले. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यापुढे सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. ते दोघे माघारी परतल्यानंतर मात्र चेन्नईने मुंबईवर दबाव टाकला. दीपक चहरने वेळीच काही मौल्यवान धावा केल्या. २० ओव्हर्समध्ये मुंबईने १५५ धावा केल्या.

फलंदाजीसाठी उतरलेल्या सलामीवीर रचिन रवींद्र शेवटपर्यंत टिकून राहीला. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने जबाबदारी उचलून अर्धशतकीय खेळी केली. त्यानंतर लागोपाठ विकेट्स गेल्यानंतर थोड्या वेळासाठी मुंबईचे पारडे जड व्हायला लागले. पण जडेजाने झटपट धावा करत सीएसकेला विजयापर्यंत पोहोचवले. तो बाद झाल्यावर एमएस धोनी खेळायला आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT