MI Vs PBKS  x
Sports

MI Vs PBKS सामन्यादरम्यान पाऊस थांबला, उशीर झाल्याने Qualifier 2 सामना कमीत-कमी किती ओव्हर्सचा होणार?

MI Vs PBKS Qualifier 2 Match : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या क्वालिफायर २ सामन्यात पावसाने एन्ट्री मारली. आता पाऊस थांबल्याने सामना लवकर सुरु होईल असे म्हटले जात आहे.

Yash Shirke

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्वालिफायर २ सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला. अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना सुरु व्हायला उशीर झाला. पाऊस आल्यानंतर ग्राउंड स्टाफने पिच झाकली. आता पाऊस थांबल्याने पुन्हा कव्हर्स काढण्यात आले आहे.

७.३० ला सामना सुरु होणे अपेक्षित होते. पण तेव्हा पाऊस सुरु झाला. पिच कव्हरने झाकण्यात आली. ८.०५ वाजता पावसाचा जोर ओसरल्याचे पाहून कव्हर काढण्यात आले. त्यानंतर ८.१५ ला पुन्हा पावसाची सुरुवात झाली. मग ८.४० ला परत कव्हर्स काढले गेले, लगेच ८.४३ ला परत एकदा पावसाची एन्ट्री झाली. आता सामना कधी सुरु होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कमीत-कमी किती ओव्हर्सचा सामना होणार?

पाऊस किंवा अन्य कारणामुळे सामना पुढे गेल्यास सामना सुरु होण्यास १२० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल असा नियम आहे. आता हा १२० मिनिटांचा कालावधी संपत आला आहे. पावसामुळे सामन्याला उशीर झाल्यास सामन्याचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. जर सामना वेळेवर सुरु झाला नाही, तर दोन्ही संघांना कमीत कमी पाच ओव्हर्स खेळायची संधी मिळेल. पण जर पाऊस थांबला नाही आणि ५ ओव्हर्सचा खेळ झाला नाही, तर सामना रद्द होईल. सामना रद्द झाल्यास कमी गुणांमुळे मुंबईचा संघ क्वालिफायर २ आणि आयपीएल २०२५ मधून बाहेर पडेल.

सामन्यात पंजाब किंग्सच्या प्लेईंग ११ मध्ये युजवेंद्र चहलला समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच रिचर्ड ग्लिसनला दुखापत झाल्याने मुंबई इंडियन्सने रिस टोप्लीला खेळण्याची संधी दिली आहे. या व्यतिरिक्त दोन्ही संघांमध्ये फारसा बदल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dupatta Draping Styles: गरब्याला लेहेंग्यासोबत ओढणी कशी करायची स्टाईल जाणून घ्या सोपी पद्धत?

Pak vs Ban : पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशनं उतरवली तगडी टीम, ३ बदल केले; जिंकणार तो थेट भारताविरुद्ध फायनल खेळणार

Central Government: राज्यावर पुराचं संकट; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Men Periods: पुरुषांनाही मासिक पाळी येते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Shocking : महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे तरुणाची आत्महत्या; ४ महिन्याचं बाळ झालं पोरकं

SCROLL FOR NEXT