सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे बॉलिवूडचे पावर कपल आहे.
सोनाक्षीचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर सोनाक्षीच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडमधून सध्या आनंदाच्या बातम्या येत आहेत. लवकरच कतरिना कैफ आई होणार आहे. तसेच परिणीती चोप्राने देखील गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. तर दुसरीकडे कॉमेडी क्वीन भारती सिंह देखील आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे. अशात आता सोशल मीडियावर आणखी एक अभिनेत्री लवकर आई होणार असल्याची चर्चा तुफान पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha Pregnancy ) आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. दोघांचे कायम मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा झहीर सोनाक्षीसोबत मस्ती करताना दिसतो. आता मात्र या क्यूट जोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लवकर आई-बाबा होणार असल्याचे बोले जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये झहीर आणि सोनाक्षी मुंबईत एक कार्यक्रमात दिसले. त्यांनी पारंपरिक लूक केला होता. सोनाक्षी सिन्हाने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सिंदूर, बिंदी तिने लावली होती. मोकळे केस सोडले होते. मिनिमल मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला होता. तेव्हा फोटो काढताना सोनाक्षी स्वतःला सावरत पोटावर हात ठेवताना दिसली. तसेच ओढणीने बेबी बंप लपवताना दिसली. त्यामुळे सोनाक्षी गरोदर असल्याची चर्चांना उधाण आले आहे.
नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर असंख्य प्रेग्नेंसी संबंधित कमेंट्स केल्या आहेत. मात्र अद्याप सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. सोनाक्षी सिन्हाने 2024 मध्ये झहीर इक्बालसोबत रजिस्टर मॅरेज केले. यापूर्वी दोघे एकमेकांना अनेक वर्ष डेट करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.