tim david twitter
Sports

IPL Auction: अदला -बदली! लाईव्ह ऑक्शनमध्ये MI अन् RCB मध्ये सिक्रेट डिल; Will Jacksला घेताच अंबानींनी थँक यू म्हटलं

IPL 2025 Mega Auction 2025, Will Jacks News: विल जॅक्सला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सिक्रेट डिल झाली.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावात खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. लिलावाच्या पहिल्या दिवशी खेळाडूंवर मोठी बोली लागली. दुसऱ्या दिवशीही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला.

गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणारा विल जॅक्स कोणत्या संघात जाणार, यावर सर्वांचं लक्ष लागून होतं. लिलाव सुरु असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सच्या संघमालकांमध्ये चर्चा झाली.

विल जॅक्स मुंबईच्या ताफ्यात

विल जॅक्स आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. गेल्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसून आला होता. आगामी हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.

जेव्हा तो लिलावात आला, त्यावेळी असं वाटलं होतं की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ त्याला संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावणार. मात्र लिलावात आल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जने त्याला संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला.

त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ मैदनात उतरला. मुंबईने ५.२५ कोटी मोजत त्याला आपल्या संघात घेतलं, त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे RTM कार्ड उपलब्ध होतं, मात्र त्यांनी त्याचा वापर केला नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाकारल्यानंतर विल जॅक्स मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मुंबईच्या फॅन्ससाठी ही गुड न्यूज आहे. कारण विल जॅक्ससारखा मॅचविनर खेळाडू कुठल्याही क्षणी येऊन संघाला विजय मिळवून देऊ शकतो. ज्यावेळी विल जॅक्स मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला, त्यावेळी मुंबईचे संघमालक आकाश अंबानी यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघमालकांना थँक यू म्हटलं.

टीम डेव्हिड आरसीबीच्या ताफ्यात

विल जॅक्स मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. तर गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळलेला टीम डेव्हिड आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. टीम डेव्हिडची बेस प्राईज २ कोटी रुपये होती. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ३ कोटी रुपयात आपल्या संघात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT