IPL 2025 mega auction  saam tv
क्रीडा

IPL 2025 Auction: कसोटीतून निवृत्त झालेला गोलंदाज IPL खेळणार! 42 वर्षीय गोलंदाजाने नोंदवलं नाव

James Anderson Registered His Name For IPL 2025 Mega Auction: इंग्लंडचा ४२ वर्षीय माजी गोलंदाज जेम्स अँडरसनने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी नाव नोंदवलं आहे.

Ankush Dhavre

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. या लिलावात जगभरातील स्टार खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. मात्र इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपलं नाव नोंदवलेलं नाही.

यामागचं कारण काय हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. माध्यमातील वृत्तानुसार,त्याने वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा माजी गोलंदाज जेम्स अँडरसनने लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. त्याची मुळ किंमत १.२५ कोटी रुपये असणार आहे.

जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा माजी गोलंदाज आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटला रामराम केला. कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर त्याने टी-२० क्रिकेट लीग खेळण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच त्याने आयपीएल लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं असल्याचं म्हटलं जात आहे. अंडरसनने नाव तर नोंदवलंय.

मात्र कुठला संघ त्याच्यावर बोली लावून त्याला आपल्या संघात स्थान देणार,हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण लिलावात १५०० हून अधिक खेळाडू असणार आहेत. यासह १० संघांना केवळ २२० खेळाडूंना खरेदी करता येणार आहे. या १५०० खेळाडूंपैकी काही खेळाडूंना बाहेर केलं जाईल. तर त्याच खेळाडूंना कायम ठेवलं जाईल, ज्यांच्यावर फ्रेंचायझी बोली लावण्यास तयार आहेत.

गेल्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर रेकॉर्डब्रेक २४.५० कोटींची बोली लागली होती. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने त्याला रिलीझ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोलकाता नाईट रायडर्स त्याला आपल्या संघात घेणार का? लिलावात त्याच्यावर किती बोली लागणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT