सध्या भारतामध्ये आयपीएलची धामधुम पाहायला मिळत आहे. भारतासह जगभरात आयपीएल २०२५ ची क्रेझ आहे. जसजशी ही स्पर्धा पुढे जात आहे, तसा रोमांचही वाढत आहे. प्रत्येक सामना क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करत आहे. दरम्यान आयपीएलशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयपीएल स्पर्धेला फिक्सिंगचा डाग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयने फिक्सिंगच्या मुद्द्यावरुन सर्व १० संघांना अलर्ट केले आहे.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगशी संबंधित सर्वजण (संघांचे मालक, खेळाडू, प्रशिक्षक, स्टाफ, कॉमेंट्रेटर) अशा लोकांना अलर्ट केले आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अँटी करप्शन अँड सिक्योरिटी यूनिटने (एसीएसयू) हैदराबाद स्थित एका व्यापाऱ्याशी संबंधित अलर्ट जारी केला आहे. हा व्यापारी भ्रष्टाचाराच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले जात आहे.
एसीएसयूच्या मते, हैदराबादच्या या व्यापाऱ्याचे बुकींशी कनेक्शन आहेत. याआधीही भ्रष्ट कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. हा व्यापारी स्वत:ला क्रिकेटचा चाहता भासवून आयपीएलशी संबंधित लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. सट्टेबाजी किंवा बेटिंगशी संबंधित कुणीही संपर्क केल्यास ताबडतोब संपर्क साधण्याचे आदेश एसीएसयूने दिले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती हॉटेल्स आणि सामन्यांदरम्यान खेळाडू, स्टाफ आणि अन्य कर्मचाऱ्यांशी मैत्री करुन त्यांना टार्गेट करते. त्याने संघातील खेळाडू, कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना देखील गिफ्ट देऊन त्यांना जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वास संपादन करण्यासाठी या व्यापाऱ्याने परदेशातील नातेवाईकांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.