Arshdeep Singh 
Sports

Flaying Jatt बनला अर्शदीप; हवेत फिरला चेंडू अन् जाळ्यात अडकला मिचेल मार्श, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

Arshdeep Singh: आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होतोय. या सामन्यात अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात आश्चर्यकारक कामगिरी केली.

Bharat Jadhav

आयपीएल 2025 च्या 13वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या संघात होतोय. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याचा श्रेयसचा निर्णय अगदी योग्य ठरला. पंजाब संघाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात लखनौ संघाला मोठा धक्का दिला.

पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात मिचेल मार्श अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने तडाखेबाज फंलदाजी केली होती. त्यामुळे या सामन्यातही तो अशीच फलंदाजी करताना दिसेल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण अर्शदीपने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

मिचेल मार्शने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 36 चेंडूत 72 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादविरुद्धही त्याने अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे पंजाब किंग्जविरुद्धही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र अर्शदीप सिंगने आपल्या अचूक गोलंदाजीने सर्वांना चकित केले. अर्शदीपने मधल्या आणि लेग स्टंपवर मागे असलेला एक स्लो चेंडू टाकला.

मार्शने आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या काठाला लागला आणि हवेत गेला. मिडऑनला मार्को जेन्सनने एक सोपा झेल घेतला. त्यामुळे मार्शला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

SCROLL FOR NEXT