delhi capitals yandex
Sports

IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ठरला? KL Rahul नव्हे, या खेळाडूला मिळणार जबाबदारी

Delhi Capitals Captain: आयपीएल २०२५ स्पर्धेा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या कर्णधाराचं नाव समोर आलं आहे.

Ankush Dhavre

सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडला होता. या लिलावात स्टार खेळाडूंवर कोटींची बोली लावली. या लिलावापूर्वी केएल राहुलने लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. यष्टीरक्षक फलंदाज असणाऱ्या केएल राहुलकडे नेतृत्वाचाही चांगलाच अनुभव आहे.

त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी फ्रेंचायझींनी जोरदार बोली लावली. या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याला संघात घेण्यासाठी चांगलाच जोर लावला. मात्र शेवटी बाजी दिल्ली कॅपिटल्सने मारली.

दिल्लीने १४ कोटी रुपये मोजत केएल राहुलला आपल्या संघात स्थान दिलं. राहुलला संघात घेतल्यानंतर, दिल्लीची कमान त्याच्याकडे सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र आता राहुल नव्हे, तर संघाची धूरा अक्षर पटेलच्या हाती दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवली जाऊ शकते. या संघात केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिससारखे अनुभवी फलंदाज आहेत. मात्र तरीसुद्धा ही मोठी जबाबदारी अक्षर पटेलला दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अक्षर पटेल हा दिल्ली संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तो २०१९ पासून या संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

गेल्या हंगामात रिषभ पंतकडे या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. तर अक्षर पटेल या संघाचा उपकर्णधार होता. आता इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठीही उपकर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अक्षर पटेलच पुढील कर्णधार होऊ शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ:

फलंदाज

केएल राहुल

ईशान पोरेल

जेक फ्रेसर-मकगर्क (ऑस्ट्रेलिया)

हॅरी ब्रूक (इंग्लंड)

आशुतोष शर्मा

समीर रिझवी

करूण नायर

फाफ ड्यू-प्लेसी (साऊथ आफ्रिका)

डोनोव्हन परेरा (साऊथ आफ्रिका)

ऑल राउंडर

अक्षर पटेल

ट्रिस्टन स्टब्स् (साऊथ आफ्रिका)

दर्शन नळकांडे

विप्राज निकम

अजय मंडल

मन्वंत कुमार

त्रिपुराणा विजय

गोलंदाज

कुलदीप यादव

मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)

टी नटराजन

मोहित शर्मा

मुकेश कुमार

दुश्मन्ता चमिरा (श्रीलंका )

माधव तिवारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT