Sports

IPL 2025 KKR vs PBKS: प्रभसिमरन आणि प्रियांशने शानदार खेळी; केकेआरला २०२ धावांचे लक्ष्य

Kolkata Knight Riders (KKR) vs Punjab Kings: कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमियर लीगच्या टुर्नामेंटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होतोय. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली.

प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात कहर केला. कोलकाता संघाच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. या दोघांनी १२० धावांची मोठी भागीदारी केली. पंजाब किंग्जच्या संघाने २० षटकांत ४ गडी गमावत २०१ धावा केल्या. या सामन्यात पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंगने ८३ धावांची खेळी केली, तर प्रियांश आर्यने ६९ धावा केल्या. केकेआरकडून गोलंदाजीत वैभव अरोराने २ विकेट्स घेतल्या.

प्रियांश आर्यने ३५ चेंडूत ६९ धावांची धमाकेदार खेळी केली. रसेल गोलंदाजी करायला आला तेव्हा १२ व्या षटकात त्याची विकेट पडली. आर्यने ८ चौकार आणि ४ षटकार मारत ६९ धावा केल्या. तर प्रभसिमरननेही स्फोटक फलंदाजी करत ३८ चेंडूत अर्धशतक झळकावलं. अर्धशतकानंतर त्याने स्फोटक फलंदाजी चालू ठेवली. त्याने ४९ चेंडूत ८३ धावा केल्या. मात्र १५ व्या षटकात त्याची विकेट पडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT