Sports

GT vs RCB: सिराजशी पंगा ना लेना! आधी ठोकला १०५ मीटरचा षटकार, नंतर उडला सॉल्टचा त्रिफळा

GT vs RCB Mohammed Siraj Wicket Video: ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघातून वगळलेला मोहम्मद सिराज आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आरसीबीचा फलंदाज फिल सॉल्टने त्याला १०५ मीटर लांब षटकार ठोकला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर सिराजने आपला बदला घेतला.

Bharat Jadhav

मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघातून वगळण्यात आले होते. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही त्याला संघात घेतले नव्हते. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. वारंवार मिळणाऱ्या डच्चूमुळे सिराजच्या मनात आग भडकत होती. त्याच आगीत आज आरसीबीचा संघ होरपळलाय.

प्रत्येक टुर्नामेंटमध्ये डच्चू मिळाल्यानंतर सिराज आयपीएल २०२५ मध्ये आपल्या गोलंदाजीतून आग ओकत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सिराज गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. आज बंगळुरुच्या स्टेडियमवर सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने आरसीबीच्या टॉप ऑर्डरला गारद केलं.

घेतला षटकाराचा बदला

आरसीबीचा सलामीवीर फिल सॉल्टची तुफानी फलंदाजी सर्वांनाच माहिती आहे. त्याने गुजरात विरुद्धातही त्याने फटकेबादी सुरू केली होती. मोहम्मद सिराजलाही त्याने जोरदार फटके मारले. सॉल्टने आयपीएल २०२५ मधील सर्वात लांब षटकार ठोकला. सॉल्टचा हा षटकार एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेला. या सिक्सची लांबी १०५ मीटर होती.

लांबलचक षटकारचा मार खाल्यानंतर सिराजने बदला घेतला. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर सिराजने दुसऱ्या चेंडूत सॉल्टचा त्रिफळा उडवला. त्या चेंडूची गती ताशी १४४ किमी वेग इतकी होती. सिराजने ताशी १४४ किमी वेगाने चेंडू ऑफ स्टंप काही फूट दूर टाकला होता. मोहम्मद सिराजने डावाच्या पहिल्याच षटकात फिल सॉल्टला बाद केले होते. मात्र, यष्टिरक्षक जोस बटलरमुळे तो बचावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT