RCB vs KKR Weather Updates google
Sports

RCB vs KKR: आयपीएलचा पहिलाच सामना रद्द होणार?, पावसाचं सावट, कसंय कोलकाताचं हवामान?

RCB vs KKR Match Weather Updates: आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असा रंगणार आहे. या सामन्यात पाउस खलनायकाची भूमिका बजावू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IPL 2025 RCB vs KKR: आयपीएल २०२५ चा थरार सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्ल्क आहेत. २२ मार्चपासून म्हणजेच उद्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला जाईल. हा सामना शनिवारी ईडन्स गार्डनवर खेळला जाईल. या सामन्यात पाऊस खलनायकाची भूमिका बजावू शकतो. अॅक्युवेदरच्या (AccuWeather) अहवालानुसार, हंगामाच्या पहिल्या सामन्यादरन्यान पाऊस पडू शकतो. यामुळे प्रेक्षकांना आयपीएलच्या पहिल्याच सामन्याचा आनंद घेता येणार नाही.

पहिल्याच सामन्यात अडथळा ठरेल पाऊस

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅक्युवेदरच्या अहवालानुसार, शनिवारी ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शनिवारी संध्याकाळी ७७ टक्के आद्रता असेल तर ताशी २२ किमी वेगाने वारे वाहतील. पाऊस पडला तर, ओव्हर्स कमी करुन सामना खेळवला जाऊ शकतो. परंतु मुसळधार पाऊस पडल्यास, खराब वातावरणामुळे पहिलाच सामना रद्द केला जाऊ शकतो. अशावेळी दोन्ही संघाना १-१ गुण दिले जाईल. जर सामना रद्द झाला तर चाहते निराश होतील.

सामन्याआधी होणार ओपनिंग सेरेमनी

सामना सुरु होण्याआधी आयपीएल ओपनिंग सेरमनी पार पडणार आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी, गायिका श्रेया घोषाल, गायक अरिजित सिंह आणि गायक करण औज परफॉर्म करणार आहे. आयपीएलने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरुन ही माहिती शेअर केली आहे. 'बीसीसीआयने आम्हाला ओपनिंग सेरेमनीसाठी 35 मिनिटे दिली आहेत, ज्यामध्ये आम्हाला संपूर्ण कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत आणि सलामीच्या सामन्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे'. अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.

एकूण ७३ सामने खेळले जातील

या हंगामात ६५ दिवसांत १३ ठिकाणी १० संघांमध्ये एकूण ७४ सामने खेळले जातील. यामध्ये ७० लीग राऊंड आणि चार प्लेऑफ सामने असतील. अंतिम सामन्यासह सर्व प्लेऑफ सामने २० ते २५ मे दरम्यान हैदराबाद आणि कोलकाता येथे खेळवले जातील. २० आणि २१ मे रोजी क्वालिफायर १, आणि एलिमिनेटरचे आयोजन हैदराबाद करेल. त्यानंतर २३ मे रोजी क्वालिफायर २, आणि २५ मे रोजी अंतिम सामन्याचे आयोजन कोलकाता करेल. आयपीएल २०२५ मध्ये एकूण १२ डबल हेडर (Double Header) असणार आहे. डबल हेडरच्या दिवशी, पहिला सामना दुपारी ३:३० वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT