अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा अंतिम सामना आज मंगळवारी खेळवला जाणार आहे. या हंगामात पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने क्वालिफायर-१ जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने दमदार कामगिरी करत क्वालिफायर-२ मध्ये विजय मिळवून अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केलं आहे. पण आयपीएल २०२५च्या अंतिम सामन्यात पाऊस खेळ खराब करू शकतो का? आणि या सामन्याचा निकाल कधी येऊ शकतो? त्याबाबत आपण जाणून घेऊया.
गुजरातसह संपूर्ण देशात हवामान बदललं आहे. हवामान खात्यानं आज गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२५च्या अंतिम सामन्यापूर्वी आज गुजरातच्या हवामानावर सर्वांचं लक्ष लागून आहे. हवामान खात्याने अहमदाबादमध्येही पावसाचा अंदाच वर्तवला आहे.
अहमदाबादमध्ये ढगांचा खेळ सुरुच, पावसाची शक्यता
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज अहमदाबादमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अंदाजे ५० ते ६० टक्के पावसाची शक्यता आहे. तापमान २६ ते ३६ अंश सेल्सिअश दरम्यान असणार आहे. सकाळपासून आकाश ढगाळ आहे, आणि दुपारी हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे.
क्वालिफायर-२ मध्ये पाऊस
१ जून रोजी अहमदाबादमधील त्याच मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात क्वालिफायर-२ देखील खेळवण्यात आला. या सामन्यात सुमारे दोन तास सतत पाऊस पडला, ज्यामुळे सामना संध्याकाळी ७:३० ऐवजी ९:४५ वाजता सुरू झाला. या सामन्यात २ तासांचा अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आला होता, ज्यामुळे सामन्यात एकही षटके कमी करण्यात आली नाहीत आणि संपूर्ण २०-२० षटकांचा सामना खेळवण्यात आला. रात्री उशिरा २ वाजेपर्यंत या सामन्याचा निकाल लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.