RCB Royal Challengers Bangalore win by 50 runs Saam Tv News
Sports

IPL 2025 : धोनीचा बालेकिल्ला RCBने केला नेस्तनाबूत; तब्बल १७ वर्षांनंतर चेपॉकवर CSKचा पराभव, माहीची जादू फेल

IPL CSK vs RCB Today Match : कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकानंतर केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने सीएसकेचा ५० धावांनी पराभव करुन दणदणीत विजय मिळवला आहे.

Prashant Patil

चेन्नई : आयपीएल २०२५ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आज शुक्रवारी चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. आरसीबीचा संघही २००८ नंतर सीएसकेचा हा बालेकिल्ला भेदू शकलेला नव्हता. पण रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १७ वर्षांचा हा दुष्काळ संपवला आहे.

कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकानंतर केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने सीएसकेचा ५० धावांनी पराभव करुन दणदणीत विजय मिळवला आहे. २००८ नंतर चेपॉक स्टेडियमवर आरसीबीचा हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत सात गडी गमावून १९६ धावा केल्या होत्या, आणि चेन्नईसमोर १९७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. परंतु चेन्नई संघ निर्धारित षटकांत आठ गडी गमावून केवळ १४६ धावाच करू शकला. विशेष बाब म्हणजे, यावेळी एमएस धोनीची जादू देखील चालू शकली नाही. बेंगळुरूने या हंगामात सलग दुसरा विजय मिळवला, तर चेन्नईने दोन सामन्यांमधील पहिला पराभव पत्करला आहे. बेंगळुरू संघ पॉइंट टेबलमध्ये टॉपला पोहोचला आहे.

आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू जिंकू शकेल की नाही? याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण यावेळी बेंगळुरू चांगल्या तयारीने आला आणि शेवटी चेन्नईचा अभेद्य किल्ला भेदण्यात यशस्वी झाला. यामध्ये बेंगळुरूच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली, आणि चेन्नईच्या पराभवाचे कारण ठरले ते म्हणजे खराब क्षेत्ररक्षण.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT