IPL 2024 Players twitter
क्रीडा

IPL 2024 Complete Schedule: आजपासून क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात! इथे पाहा IPL स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Ankush Dhavre

IPL 2024 Timetable Schedule And Squads:

आजपासून क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या लीग स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला चेंडू टाकला जाईल. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जने गुरुवारी मोठी घोषणा केली आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करणारा एमएस धोनी कर्णधार पदावरून पायउतार झाला आहे. त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाड संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक.

असे आहे वेळापत्रक (२२ मार्च ते ७ एप्रिल) (IPL 2024 Timetable)

२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई (संध्या.६.३० वाजता)

२३ मार्च - पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मोहाली (दु. २.३० वाजता)

२३ मार्च - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता (संध्या.६.३० वाजता)

२४ मार्च - राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, जयपूर (दु. २.३० वाजता)

२४ मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद (संध्या.६.३० वाजता)

२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, बंगळुरू (संध्या.६.३० वाजता)

२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, चेन्नई (संध्या.६.३० वाजता)

२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद (संध्या.६.३० वाजता)

२८ मार्च - राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर (संध्या.६.३० वाजता)

२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगळुरू (संध्या.६.३० वाजता) (Cricket news in marathi)

३० मार्च - लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, लखनऊ (संध्या.६.३० वाजता)

३१ मार्च - गुजराट टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद (दु. २.३० वाजता)

३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, विशाखापट्टणम (संध्या.६.३० वाजता)

१ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई (संध्या.६.३० वाजता)

२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, बंगळुरू (संध्या.६.३० वाजता)

३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, विशाखापट्टणम (संध्या.६.३० वाजता)

४ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, अहमदाबाद (संध्या.६.३० वाजता)

५ एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद (संध्या.६.३० वाजता)

६ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, जयपूर (संध्या.६.३० वाजता)

७ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई (दु. २.३० वाजता)

७ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनऊ (संध्या.६.३० वाजता)

असे आहेत सर्व १० संघांचे १० कर्णधार (IPL Teams Captain)

मुंबई इंडियन्स - हार्दिक पंड्या

दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत

चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - फाफ डू प्लेसिस

कोलकाता नाईट रायडर्स - श्रेयस अय्यर

गुजरात टायटन्स - शुभमन गिल

राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन

पंजाब किंग्ज - शिखर धवन

सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिन्स

लखनऊ सुपर जायंट्स - केएल राहुल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

Upcoming Marathi Movie 2024: ऑक्टोबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा गाजावाजा, कोणता चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

SCROLL FOR NEXT