IPL 2024 News : इंडियन प्रीमियर लीग म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी धमाल असते. फॅन्स दरवर्षी या क्रिकेटच्या उत्सवाची वाट पाहत असतात. मात्र यंदा क्रिकेट चाहत्यांच्या हाती काहीशी निराशा लागू शकते. कारण आयपीएल २०२४ चं आयोजन परदेशात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२४ मध्ये देशात लोकसभेची निवडणूक पार पडच आहे, हे त्याचं मुख्य कारण असू शकतं. मात्र अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
'आज तक'च्या वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच आयपीएल 2024 चे आयोजन करू शकते. मात्र यंदाच्या आयपीएलवर लोकसभा निवडणुकीचा परिणाम होऊ शकतो. आयपीएल 2024 मार्चमध्ये आयोजित केले जाऊ शकते. त्याचा अंतिम सामना मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. पण सध्या संपूर्ण लक्ष 2023 च्या विश्वचषकावर आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जाईल. (Sports News)
लोकसभा निवडणुका आणि आयपीएल दोन्ही एकाच वेळी आल्याने सुरक्षा यंत्रणांवर दबाव येऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आयपीएलचा पुढचा सीझन लवकर पार पाडण्याबरोबरच परदेशातही त्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. (Latest sports updates)
याआधीही परदेशात आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे दक्षिण आफ्रिकेला आयपीएलची स्पर्धा भरवण्यात आली होती. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीमुळे, त्याचे काही सामने यूएईमध्ये खेळवले गेले होते. त्यानंतर काही सामने भारतात झाले. आयपीएल 2014 चा अंतिम सामना बंगळुरू येथे खेळला गेला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.