ipl 2024 virat kohli dance during csk vs rcb match video went viral  twitter
Sports

Virat Kohli Dance Video: विराट कोहलीचा 'अप्पाडी पोडु' वर भन्नाट डान्स! Live सामन्यातील Video तुफान व्हायरल

CSK vs RCB, IPL 2024: या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियार तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

CSK vs RCB, Virat Kohli Dance Video:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. सध्या तो आयपीएल २०२४ स्पर्धेत फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतोय. या स्पर्धेतील पहिला साामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियार तुफान व्हायरल होत आहे. (Virat Kohli Dance)

विराट कोहली फलंदाजी करत असताना आपल्या शानदार शॉर्ट्सने क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. तर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या हटके डान्स स्टेप्सने तो क्रिकेट फॅन्सचं लक्ष वेधून घेत असतो. असाच काहीसा नजारा चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाला आहे.

हा सामना चेन्नईच्या मैदानावर पार पडला. मात्र क्रिकेट फॅन्स विराट..विराटच्या घोषणा देत होते. ज्यावेळी मैदानात दाक्षिणात्य गाणं वाजवलं गेलं त्यावेळी विराट कोहली डान्स करताना दिसून आला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Cricket news in marathi)

विराटचा मोठा रेकॉर्ड ..

या सामन्यात विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या २१ धावा करत माघारी परतला. दरम्यान १५ धावा करताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा करण्याचा कारनामा केला आहे. असा कारनामा करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज..

विराट कोहली - १२०१५ धावा

रोहित शर्मा - १११५६ धावा

शिखर धवन - ९४६५ धावा

सुरेश रैना - ८६५४ धावा

केएल राहुल -७०६६ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

SCROLL FOR NEXT