IPL 2024 Updates Good News For Mumbai Fans will rohit sharma become mumbai indians captain again Saam TV
Sports

Mumbai Indians Captain 2024: रोहित शर्मा पुन्हा बनणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार? समोर आलं मोठं कारण...

Rohit Sharma Latest News: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Mumbai Indians Captain IPL 2024 Update

आयपीएल २०२४ स्पर्धेचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला. ट्रेंड विंडोमधून मुंबईने हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करुन घेतलं. इतकंच नाही, तर त्याला कर्णधारपदही दिलं. हार्दिकसारखा सक्षम कर्णधार मिळाल्याने मुंबईचा संघ आणखीच मजबूत झाला आहे. दुसरीकडे रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते नाराज झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहितसारखा चाणाक्ष कर्णधार असताना हार्दिककडे (Hardik Pandya) संघाचं कर्णधारपद देण्याची गरजच काय होती? असा प्रश्न विचारत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच नाराज होऊन बसलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. हार्दिक पंड्या सध्या दुखापतग्रस्त असून त्याला कमबॅक करण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो मुकण्याची शक्यता आहे.

अशातच हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णदारपदाची सूत्रे रोहित शर्माच्या हाती येऊ शकतात. रोहित शर्माच्या आयपीएल करिअरबाबत बोलायचं झाल्यास तो मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

त्याच्या नेतृत्वात मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावलं आहे. रोहितने १६३ सामन्यांमध्ये MI चे नेतृत्व करताना ९१ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६८ सामने गमावले असून ४ सामने बरोबरीत सुटले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT