आयपीएल २०२४ स्पर्धेतील १८ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने २० षटकात १६५ धावा करत हैदराबादला १६६ धावांचे आव्हान दिले आहे. दरम्यान हैदराबाद हे आव्हान कशाप्रकारे पार करणार हे पाहावे लागेल. (Latest News)
सीएसकेने १६५ धथवा करताना ५ विकेट गमावल्या होत्या. सीएसके नेहमी आपल्या डावपेचानुसार समोरील संघाला खेळाण्यास भाग पाडत असते. परंतु आज घरच्या मैदानात खेळणाऱ्या हैदराबाद संघाने चेन्नईचा सर्व डाव फेल ठरवले. नेहमी सीएसकेकडून होणारा चौकार आणि षटकारांचा वर्षाव या सामन्यात पाहण्यास मिळाला नाही. सीएसकेला कमी धावांमध्ये रोखत हैदराबादने विजयाचा आशा पल्लवित केल्यात. हैदराबादच्या संघाचा कर्णधार कमिन्सने योग्य रणनिती आखात सीएसकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करू दिली नाही.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना सीएसकेची सुरुवात खराब राहिली. सीएसकेकडून सर्वोत्कृष्ट फलंदाजी शिवम दुबेने केली. त्याने ४५ धावांची खेळी केली यात २ चौकार आणि ४ षटकाराचा समावेश आहे. तर रहाणेने ३५ धावा केल्या. यात २ एका षटकाराचा समावेश आहे. जडेजाने नाबाद ३१ केल्या तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने २६ धावा जोडल्या. धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने २ चेंडूत केवळ एक धाव घेतली. हैदराबादसाठी भुवी, कमिन्स, शाहबाज आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.