Sports

SRH vs MI: अभिषेक शर्मा, क्लासेनकडून 'क्लास' फटकेबाजी; धावांचा डोंगर उभारत मुंबईसमोर २७८ धावांचं लक्ष्य

SRH vs MI IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी मुंबईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. हैदराबादच्या फलंदाजांनी आपल्या डावात १९ चौकार आणि १८ षटकार लगावलेत. या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईसमोर धावांचं डोंगर उभारलं आहे.

Bharat Jadhav

Sunrisers Hyderabad Score 277 Against Mumbai Indians:

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या ८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्सच्या खेळाडूंनी रुद्ररुप धारण करत मुंबईच्या गोलंदाजाची जोरदार धुलाई केली. निर्धारित २० षटकात हैदराबादच्या संघाने ३ विकेट गमावत २७७ धावा करत सर्वात मोठा स्कोअर केला. क्लासेनने २३ चेंडू अर्धशतक केलं. तर अभिषेक शर्माने १६ चेंडूमध्ये अर्धशतक केलं. या दोघांच्या खेळीने हैदराबादने मुंबईसमोर २७८ धावांचे आव्हान ठेवलं आहे. (Latest News)

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. परंतु कर्णधार हार्दिक पांड्याचा पुन्हा एकदा निर्णय चुकला. हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सुरुवातीच्या तासातच हार्दिकचा निर्णय चुकीचा ठरल्याचं सिद्ध केलंय.

क्लासेनने क्लास खेळी करत मु्ंबईच्या गोलंदाजाला गुडघे टेकायला लावले. क्लासेनने ३४ चेंडूत ८० धावा केल्या. ट्रेविस हेडने २४ चेंडूमध्ये ६२ धावा केल्या.यात ९ चौकार आणि ३ षटकारचा समावेश आहे. त्यानंतर अभिषेक शर्माने मुंबईच्या गोलंदाजांना जोरदार चोप देत १६ चेंडूत अर्धशतक केलं. त्यानेही २३ चेंडूमध्ये ६३ धावा केल्या, यात ३ चौकार आणि ७ षटकाराचा समावेश आहे. या दोन्ही फंलदाजांनी मनसोक्त फटकेबाजी केल्यानंतर मैदानात आलेल्या माक्रमने नाबाद राहत २८ चेंडूत ४२ धावा केल्या. यात २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. या सर्वांच्या दमदार खेळीने हैदराबादने त्यानंतर आयपीएलच्या इतिहासात मोठा विक्रम केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर MIDC मध्ये 5 दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता

Driving License: घरबसल्या कसं बनवायचं लर्निंग लायसन्स? कोणते कागदपत्र लागतात, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Weight loss injection: लठ्ठपणावर मात करणं आता झालं स्वस्त, वजन घटवणारं औषध ₹900 पासून उपलब्ध

Salary Cuts: मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांच्या पगारात कपात, नेमकं कारण काय?

Banana Water Use For Long Hair : लांब केसांसाठी करा केळीच्या सालीचा वापर, केस झटपट वाढतील

SCROLL FOR NEXT