IPL 2024 SRH vs MI Akash ambani talk with rohit sharma after lost against sunrisers hyderabad hardik pandya  twitter
Sports

SRH vs MI,IPL 2024: मुंबई इंडियन्समध्ये भाकरी फिरणार? सामन्यानंतर रोहित अन् आकाश अंबानीमध्ये काय चर्चा झाली?

Rohit Sharma Aakash Ambani Viral Photo: हा सामना झाल्यानंतर माजी कर्णधार रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Viral Photo, SRH vs MI:

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळतान आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. हा सामना मुंबई इंडियन्सने ३१ धावांनी गमावला. या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान हा सामना झाल्यानंतर माजी कर्णधार रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

हे हंगाम सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला होता. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता सोशल मीडियावर आकाश अंबानी आणि रोहित शर्माचा चर्चा करत असतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, मुंबई इंडियन्समध्ये भाकरी फिरणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. (Cricket news in marathi)

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २७७ धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यापूर्वी सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर होता.

आता हा विक्रम हैदराबादच्या नावावर नोंदवला गेला आहे. हैदराबादकडून फलंदाजी करताना हेनरिक क्लासेनने ८० धावांची खेळी केली. त्याने केवळ ३४ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकार मारत ही वादळी खेळी केली. यासह अभिषेक शर्माने ६३ आणि ट्रेविस हेडने ६२ धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी २७८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना तिलक वर्माने ६४ धावांची खेळी केली. मुंबईच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. मात्र गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईमध्ये राज ठाकरेंना शिवीगाळ; परप्रांतीयाने तोडले अकलेचे तारे, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: धुळ्यात चोरट्यांनी धाडसी चोरी करत पाच तोळे सोन्यासह केली रोकड लंपास

बैलांसमोर नाचवल्या नर्तिका, ग्रामपंचायतीच्या छतावर डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीताच्या घटास्फोटवर वकिलाचा मोठा खुलासा; म्हणाले...

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? जाणून घ्या खास नैवेद्याची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT