Jio Cinema  
क्रीडा

SRH vs CSK: पॅट कमिन्सनं दाखवली माणुसकी; जडेजाला जीवनदान देत जिंकली नेटकऱ्यांची मने

IPL 2024 SRH vs CSK: आयपीएल २०२४ चा १८ वा सामना चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात हैदराबादमध्ये खेळला जातोय. या सामन्यात खिलाडूवृत्तीचे सर्वात मोठे उदाहरण पाहायला मिळाले तेही एका ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सकडून. पॅट कमिन्सने स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचे अपील मागे घेतल्याने जडेजाला जीवनदान मिळाले.

Bharat Jadhav

Srh Captain Pat Cummins Shows Kind Side :

आयपीएल २०२४ चा १८ वा सामना चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पॅट कमिन्सचा हा निर्णय संघाने गोलंदाजांनी योग्य ठरवत चेन्नईला अडचणीत आणलं. हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या संघाला फक्त १६५ धावा करू दिल्या. (Latest News)

सीएसकेचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायर्झसच्या संघाने दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने येताच चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली. त्याने अवघ्या १२ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडही ३१ धावा केल्या. गेल्या सामन्यात या दोन्ही फलंदाजांनी मुंबईविरुद्धही धमाकेदार खेळी केली होती. हैदराबादने मुंबईविरुद्धच्या विक्रमी २७७ धावा धावफलकावर लावल्या होत्या. ही आयपीएलची सर्वोच्च धावसंख्या ठरलीय.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या दोन्ही खेळाडूनंतर यानंतर मार्करामने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण ५० धावा केल्या आणि नंतर तो बाद झाला. यानंतर शाहबाज अहमद १८ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याच्या नंतर मैदानात क्लासेन उतरला त्याने नाबाद राहत १० तर नितीश रेड्डीने १४ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिलं.

हैदराबादची उत्कृष्ट गोलंदाजी

हैदराबादकडून घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी पाहायला मिळाली, मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी. हैदराबादसाठी ५ गोलंदाजांनी प्रत्येकी १ बळी घेतला. त्यामुळे सीएसके संघ स्कोअरबोर्डवर केवळ १६५ धावाच करू शकला. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वात वेगवान ४५ धावा केल्या. याशिवाय अजिंक्य रहाणेनेही ३५ धावांची खेळी खेळली. मात्र विजय मिळून देणाऱ्या धावा करण्यास ते अपयशी ठरले.

सीएसकेचा फलंदाज धावांसाठी धावपळ करताना दिसून आले. याच दरम्यान रविंद्र जडेजा एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्याचा हा प्रयत्न भुवनेश्वर कुमारने हाणून पाडला. धावा घेण्यासाठी पळत असताना भुवनेश्वर त्याला धाव बाद करण्याचा प्रयत्न केला. पण थ्रोच्या आत रविंद्र जडेजा आल्याने थ्रो स्टम्पला लागू शकला नाही. त्यानंतर जडेजा बाद करण्याची अपील करण्यात आली. त्यावर मात्र कमिन्स अपील न करत जडेजाला जीवनदान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT