IPL 2024 Timetable Saam Tv
Sports

IPL 2024 Schedule Phase-1:आयपीएल १७ व्या हंगामाचं अर्ध वेळापत्रक जाहीर; 'या' संघांमध्ये रंगणार पहिला सामना

IPL 2024 Timetable : इंडियन प्रीमियर लीग १७ व्या हंगामाच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होईल आणि पहिला सामना CSK आणि RCB यांच्यात होणार आहे. आता पहिल्या टप्प्यात १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

IPL 17th Season IPL 2024 Timetable Announced :

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १७ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यांत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्याच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीय. आयपीएलचा आगामी हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यात पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.(Latest News)

सध्या पहिल्या टप्प्यात ७ एप्रिलपर्यंत १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. टी २० वर्ल्ड कपच्या दृष्टीने यंदाचा आयपीएल हंगाम खूप महत्त्वाचा आहे. आयपीएल संपल्यानंतर टी२० वर्ल्डकपचे सामने होणार आहेत.दरम्यान आयपीएलच्या हंगामाआधी काही खेळाडूंनी या सत्रातून माघार घेतलीय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IPL 2024 Timetable

आयपीएलच्या आगामी हंगामात खेळणाऱ्या सर्व १० संघांना २ वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जाणार आहे. यातील एका गटातील संघ एकमेकांविरुद्ध २ सामने खेळतील. तर दुसऱ्या गटातील संघाविरुद्ध एकच सामना खेळावा लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने मागील सत्रात ट्रॉफी जिंकली होती. आता या संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश झालाय. ज्यामध्ये रचिन रवींद्रचे नाव देखील आहे, त्याने एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती.

गुजरात टायटन्सला मोठा धक्का

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. या स्पर्धेत त्याने कमी सामने खेळून सर्वाधिक गडी बाद केले होते. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं आहे. शमीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार मोहम्मद शमी आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आयपीएल (IPL) स्पर्धेतून बाहेर होणं हा गुजरात टायटन्स आणि भारतीय संघासाठी (Team India) मोठा धक्का आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT