SRH vs RR highlights x
क्रीडा

SRH vs RR highlights : हैदराबादच्या फिरकीपटूंनी राजस्थानची झोप उडवली; ९ षटकात सामना फिरला, शाहबाज आणि अभिषेकने केली जादू

Vishal Gangurde

मुंबई : चेपॉकमध्ये राजस्थान आणि हैदराबादसंघामध्ये रोमहर्षक सामना झाला. हैदराबादच्या खेळाडूंनी कमाल दाखवत राजस्थानला धूळ चारली. हैदराबादने राजस्थानचा पराभव करत दणक्यात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. या सामन्यातील ९ षटकात सामना फिरल्याचे दिसून आलं. या सामन्यात हैदराबादच्या शाहबाज आणि अभिषेक शर्माने जबरदस्त जादू दाखवली. त्यांच्या खेळीने हैदराबादने फायनलमध्ये रुबाबात एन्ट्री मारली.

हैदराबादच्या विजयाचे खरे हिरो 'प्लेअर ऑफ द मॅच' शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा ठरले. अभिषेक शर्मा फलदांजीसोबत गोलंदाजीमध्येही जादू दाखवली. हैदराबादच्या फिरकीपटूंनी एकूण ९ षटक टाकले. हाच संघाच्या विजयाचा टर्निंग पॉइंट ठरला.

हैदराबादच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत ९ गडी गमावून १७५ धावा उभारल्या. हैदराबादसाठी हेनरिक क्सासेनने सर्वाधिक ३४ चेंडूवर ५० धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने ३७ धावा केल्या. हेडने ३७ धावा कुटल्या. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्माने तीन-तीन गडी बाद केले. आवेश खानने देखील दोन गडी बाद केले.

हैदराबादने फारशी मोठी धावसंख्या उभारली नव्हती. राजस्थानचा कर्णधार संजूने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी उतरवलं. त्यानंतर हैदराबादने १७५ धावा केल्या. त्यामुळे संजू सॅमसनला काहीसा दिलासा मिळाला होता.

राजस्थानचा संघ धावसंख्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. तर राजस्थानने १ गडी गमावून ६५ धावा कुटल्या. त्यानंतर हैदराबादचा फिरकीपटू शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्माने खेळ दाखवण्यास सुरुवात केली. शाहबाजने यशस्वी जायस्वाल, रियान पराग, रविचंद्रन आश्विनला बाद केलं. तर अभिषेकने संजू आणि शिरमॉनला बाद केलं.

सामन्यात दोघांच्या गोलंदाजीने सामना फिरला. हैदराबादच्या फिरकीपटूंनी ९ षटकात ५७ धावा देत ५ गडी बाद केले. तर दुसरीकडे राजस्थानच्या खेळाडूंनी ८ षटकात ७७ धावा दिल्या होत्या. आर. आश्विनने ४ षटकात ४३ धावा दिल्या. तर चहलने ३४ धावा दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT