IPL 2024 playoff KKR vs SRH Pitch Report Narendra Modi stadium pitch prediction amd2000 saam tv
Sports

KKR vs SRH: हैदराबाद की कोलकाता; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कोणाला मिळवून देणार फायनलचं तिकीट?

IPL 2024 Playoffs, KKR vs SRH Pitch Report: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. प्लेऑफचा पाहिला सामना २१ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. एकीकडे २० गुणांसह अव्वल स्थानी असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ तर दुसरीकडे १७ गुणांसह दुसऱ्या स्थानी असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.

कशी असेल खेळपट्टी?

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. आयपीएल २०२४ स्पर्धेत या मैदानावर झालेल्या सामन्यातही धावांचा पाऊस पाडला गेला आहे. त्यामुळे कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यातही चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. यासह ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरली आहे. गेल्या ५ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला तरी, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

कोणाला होणार फायदा?

या खेळपट्टीचा सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा फायदा होऊ शकतो. याच मैदानावर वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने शानदार खेळी केली होती. आयपीएल २०२४ स्पर्धेतही त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यामुळे या सामन्यातही तो मोठी खेळी करू शकतो.

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टिरक्षक फलंदाज फिल सॉल्ट टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी मायदेशी परतला आहे. त्यामुळे सलामीला त्याची कमतरता जाणवू शकते. तर दुसरीकडे सुनील नरेनकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पुण्यात पुन्हा दहशतवादी? 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर झळकले; ATS कडून १९ ठिकाणी छापेमारी

Diwali Gold Buying Tips: दिवाळीत सोने खरेदी करताय? या चुका टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान

SEBI Recruitment: सेबीमध्ये ग्रेड A ऑफिसर पदासाठी भरती; पगार १.८४ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Samsaptak Yog: 30 वर्षांनंतर शनी-शुक्र बनवणार समसप्तक योग; 'या' राशींच्या आयुष्यात अचानक येणार सुखाते क्षण

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT