IPL 2024 Mysterious Girl Saam Digital
Sports

IPL 2024 Mysterious Girl : कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, जिनं पंड्या, रोहित शर्मा सोबत केलं फोटोशूट, Viral Photos

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान रोहित शर्मा, पंड्यासोबत आणि इतर खेळाडूंसोबत एका तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही तरुणी नेमकं कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Sandeep Gawade

IPL 2024 Mysterious Girl

आयपीएलच्या 17 व्या सत्रात मुंबई इंडियन्सचा संघ संघर्ष करताना दिसतोय. पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्यापही विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या दोन सामन्यामधील पराभवानंतर मुंबईचा संघ त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर पुढील चार मॅच खेळणार आहे. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या संघाचा इतर खेळाडूंसोबत एका मुलीचे फोटो व्हायरल झाले होते. ती मुलगी कोण आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. रोहित शर्मा, बुमराह, पंड्यासोबत आणि इतर खेळाडूंसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता.

मुंबई इंडियन्स संघासोबत व्हायरल झालेल्या फोटोमधल्या तरुणीचं नाव सेजल जयस्वाल आहे. ती एक प्रोफेशनल मॉडल आहे. सेजलनं तीच्या मॉडलिंग कारियरची सुरुवात तिच्या वयाच्या १९ व्या वर्षी केली. सेजलने 'दिल मांगे मोअर' आणि 'डेडींग इन डार्क' या प्रसिद्ध मालिकांमधून मोठ्या परद्यावर झळकली आहे. व्हायरल फोटोमध्ये सेजल मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंसोबत फ्लाइटमध्ये एकदम खुश दिसत आहे. सेजल मुंबई इंडियन्सची खुप मोठी चाहती असल्याचं कळतयं. ती तीच्या सोशल मिडियावर खेळाडूंसोबतचे फोटो आणि रिल्स शेअर करत असते.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईला विजयाची प्रतीक्षा

मुंबई संघाच्या पुढील चार सामने वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.त्यांची आयपीएल २०२४ ची सुरुवात जरी निराशाजनक ठरली असली तरी त्याच्या पुढील सामने संघाच्या होम ग्राउंडवर होणार आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर हैदराबाद संघाने मुंबईचा 31 धावांनी पराभव केला.

आयपीएल २०२४ मध्ये एक ट्रेंड पाहायला मिळतोय. आतापर्यंत ज्या संघाचा होम ग्राऊंडवर सामना झालेला आहे, त्या संघाने विजय मिळवला आहे. आता मुंबईचा पुढील सामना राजस्थान विरुद्ध 1 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात तरी मुंबईला विजय मिळवता येणार का याची क्रिकेटप्रेमींना आतुरता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT