MI vs DC IPL 2024 Mumbai indians beat delhi capitals mi vs dc match highlights amd2000 twitter
क्रीडा

MI VS DC: पहिला विजय अन् ५ मोठे विक्रम; मुंबई इंडियन्सची जबराट कामगिरी!

IPL 2024: दिल्ली विरुद्धच्या सामन्यात सलग 3 पराभवानंतर मुंबईने विजयाची चव चाखली. मुंबईच्या फलंदाजांनी तुफान खेळी करत धावांचा डोंगर उभारला. विशेष म्हणजे मुंबईने पहिल्या विजयासोबत पाच मोठे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

Gangappa Pujari

Mumbai Indiance Vs Delhi Capitals:

दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला आहे. सलग 3 पराभवानंतर मुंबईने विजयाची चव चाखली. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी तुफान खेळी करत धावांचा डोंगर उभारला. विशेष म्हणजे मुंबईने पहिल्या विजयासोबत पाच मोठे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

मुंबई इंडियन्सचे ५ मोठे विक्रम!

१. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध आपला ५० वा विजय नोंदवला आहे. या विजयासह मुंबई एकाच स्टेडियमवर सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला आहे. आजपर्यंत कोणत्याही संघाला कोणत्याही एका मैदानावर ५० सामने जिंकता आलेले नाहीत. मुंबईनंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ईडन गार्डन्सवर ४८ सामने जिंकले आहेत.

२. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये १५० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. मुंबईशिवाय आयपीएलचा कोणताही संघ किंवा कोणताही आंतरराष्ट्रीय संघ १५० टी-ट्वेंटी सामने जिंकू शकलेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने १४८ टी-ट्वेंटी सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर १४४ टी-ट्वेंटी सामने जिंकून भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

३. मुंबई इंडियन्सने कोणत्याही T20 सामन्यात एकाही खेळाडूने अर्धशतक न करता सर्वोच्च धावसंख्या केली आहे. एमआयने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 5 गडी गमावून 234 धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान एकाही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नाही. रोहित शर्माने सर्वाधिक 49 धावा केल्या.

४. मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोमॅरियो शेफर्डने १० चेंडूत ३९ धावा करत अनोखा विक्रम केला. आजपर्यंत असा एकही संघ नाही ज्याच्या खेळाडूने किमान १० चेंडू खेळले तर त्याचा स्ट्राईक रेट ३९० असेल. पण मुंबईच्या फलंदाजाने ही कामगिरी केली आहे.

५. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला एकाच सामन्यात सर्वाधिक पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीचा गोलंदाज एनरिक नॉर्खियाने या सामन्यात ४ षटकात ६५ धावा दिल्या आहेत. यापूर्वी उमेश यादवच्या नावावर हा नकोसा विक्रम नोंदवण्यात आला होता. त्याने आयपीएल २०१३ मध्ये आरसीबीविरुद्ध ४ षटकात ६५ धावा दिल्या होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT