Hardik Pandya  yandex
Sports

IPl 2024: हार्दिक पांड्याचं T20WC मध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार? पुढील ८सामन्यात ठरणार भवितव्य

Hardik Pandya T20 Word Cup : पांड्या आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. पहिल्या ६ लीग सामन्यांमध्ये त्याची ना फलंदाजी चांगली झाली ना गोलंदाजी.

Bharat Jadhav

Hardik Pandya T20 Word Cup : T20 विश्वचषक १ जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड प्रक्रिया एप्रिलच्या अखेरीस होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याचा फॉर्म हा बीसीसीआयच्या निवड समितीसाठी चिंतेचा विषय ठरलाय.

पांड्या आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. पहिल्या ६ लीग सामन्यांमध्ये त्याची ना फलंदाजी चांगली झाली ना गोलंदाजी. सीएसकेविरुद्ध त्याने एका षटकात २६ धावा दिल्याने त्याच्या गोलंदाजीवर आणखी प्रश्न निर्माण झालेत. हार्दिकची आतापर्यंत कामगिरी पाहिली त्यावरून त्याच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हार्दिकचा खराब फॉर्म असाच सुरू राहिला तर त्याचा T-20 विश्वचषकासाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघात समावेश होईल का असा प्रश्न विचारला जात आहे.

हार्दिकची जागा भरून काढण्यासाठी निवड समितीसमोर अनेक खेळाडूंचा पर्याय आहे. शिवम दुबेचा फॉर्म पाहतातो हार्दिकची जागा घेऊ शकतो. दुबेचा फॉर्म पाहून निवडकर्ते नक्कीच खूश असतील. दुबे आयपीएलमध्ये सीएसकेच्या संघाकडून दमदार खेळ करत आहे.

दरम्यान हार्दिक पांड्या आपल्या मुंबईच्या संघाकडून सहाव्या क्रमांकवर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरतो. हार्दिकने आपल्या ६ सामन्याच्या डावात १३१ धावा केल्यात. त्याचा स्ट्राइक रेट हा फक्त १४६.५६ राहिलाय. हा स्ट्राइक रेट पण आरसीबी संघाविरुद्धात केलेल्या फलंदाजीमुळे बनलाय.

या सामन्यातील त्याची फलंदाजी सोडली तर इतर संघाविरुद्धात झालेल्या डावात त्याची फलंदाजी अगदीच साधारण राहिलीय. हार्दिकने आतापर्यंत ६ सामने खेळलेत. यात गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने ११ धावा केल्या. हैदराबादविरुद्ध २४, राजस्थानविरुद्ध ३४ धावा केल्या. दिल्लीच्या संघाविरुद्ध ३९ धावा, आरसीबीविरुद्धात २१ तर सीएसकेविरुद्ध फक्त २ धावा केल्या आहेत.

गोलंदाजीतही हार्दिकने विशेष अशी कामगिरी केली नाहीये. हार्दिकने ६ सामन्यातील हैदरबादविरुद्ध झालेल्या सामन्यातच त्याने आपल्या पूर्ण षटक टाकलेत. राजस्थान आणि दिल्लीच्या विरुद्ध त्याने गोलंदाजी केली नव्हती. या सहा सामन्यांमध्ये हार्दिकने ६६ चेंडू टाकलेत,यात फक्त ३ विकेट मिळाल्यात. त्याने १२.०० च्या स्ट्राइक रेटने धावा दिल्या.

सीएसकेच्या विरुद्धात केलेल्या गोलंदाजीत धोनी त्याला भंयकर चोप दिला. धोनी षटकारांची हॅट्रिक केली होती. धोनीने दिलेला चोप हार्दिक कधीच विसरू शकणार नाही. सीएसकेविरुद्ध त्याने तीन षटक टाकले होते, यात त्याने ४३ धावा दिल्या होत्या आणि २ विकेट घेतल्या. याआधी हैदराबादविरुद्ध खेळताना हार्दिक ४ षटक टाकले होते, त्यात ४६ धावा देत १ विकेट घेतली होती.

हार्दिक पांड्या हा अतिशय गुणवान खेळाडू आहे आणि त्याच्या उपस्थितीमुळे संघ मोठा समतोल साधत असतो. पण त्याचा खराब फॉर्म भारतासाठी मोठी समस्या आहे. संघाचा समतोल राखण्यासाठी भारताला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्यावर अवलंबून राहावे लागेल, परंतु त्याची खराब गोलंदाजी पाहता भारतीय संघाची चिंता वाढलीय.

मोहम्मद शमी टी२० विश्वचषकातून बाहेर पडणे निश्चित झालंय. हार्दिक हा जसप्रीत बुमराहनंतर भारताचा दुसरा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असेल. जर रोहित शर्मा हार्दिकवर ४ षटके टाकण्यासाठी विश्वास ठेवू शकला नाही तर ही मोठी समस्या असणार आहे. हार्दिकला आपलं कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी आयपीएल स्पर्धेतील ८ सामन्यात संधी आहे. या सामन्यामध्ये हार्दिक चांगली कामगिरी करू शकला नाही तर त्याला वर्ल्डकपच्या स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT