ipl 2024 latest points table update after rcb vs kkr match points table news in marathi  twitter
Sports

IPL 2024 Points Table: केकेआरच्या विजयाने गुणतालिकेत मोठा फेरबदल! मुंबई अन् RCB चं टेन्शन वाढलं

RCB vs KKR, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

IPL 2024 Points Table:

आयपीएल २०२४ स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात कोलकाताने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. चिन्नास्वामीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात वेंकटेश अय्यर आणि सुनील नरेनच्या खेळीच्या बळावर कोलकाताने हा सामना एकतर्फी जिंकला. दरम्यान या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने या स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकले आहेत. २ सामन्यातील २ विजयांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर सलग २ सामने जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. चेन्नई आणि कोलकाताचे गुण सारखेच आहेत. मात्र नेट रनरेटच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने अव्वल स्थान गाठलं आहे.

तर रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाबद्दल बोलायचं झालं तर, ३ पैकी १ सामना जिंकून हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ दुसऱ्या स्थानी पोहचल्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी पोहोचला आहे. (Cricket news in marathi)

पंजाब किंग्जचा संघ या यादीत पाचव्या स्थानी आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने २ पैकी १ सामना जिंकला आहे. तर गुजरात टायटन्स संघाला देखील २ पैकी १ सामना जिंकता आला आहे. हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

मुंबईचा संघ शेवटी ...

मुंबई इंडियन्स संघाला या हंगामात हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ आठव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT