IPL 2024 SRH Vs KKR Final 
Sports

IPL 2024 SRH Vs KKR Final: हैदराबादचा पराभवही झाला अन् नावावर लाजीरवाणा विक्रमही राहिला; काय आहे नकोसा रेकॉर्ड?

IPL 2024 SRH Vs KKR : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या अंतिम सामना कोलकाता नाईटरायडर्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये झाला. या सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव झाला.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव झाला. संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी असलेल्या संघातील गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या हैदाराबादचे फलंदाज कोलकाता नाइटरायडर्सच्या गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरलेत. कोणत्याच फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या सामन्यात हैदराबादचा पराभव तर झालाच शिवाय त्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम झालाय.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबादने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या आणि त्यांना केवळ ११३ धावा करता आल्या. आयपीएल फायनलमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. कोलकाताला तिसरी ट्रॉफी जिंकण्यासाठी ११४ धावा करायचा होत्या.

आयपीएल फायनलमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी २०१३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२५/९ धावा केल्या होत्या. २०१७ च्या फायनलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १२९ धावा करत सामना जिंकला. हैदराबादची पहिली विकेट पहिल्या षटकाच्या ५व्या चेंडूवर पडली. सलामीवीर अभिषेक शर्माने ३२ धावा केल्या. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हैदराबादला दुसरा धक्का बसला.ट्रॅव्हिस हेड गोल्डन डकचा बळी ठरला.

चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हैदराबादचा तिसरा खेळाडू मध्ये परतला. राहुल त्रिपाठीने १३ चेंडूत ९ धावा केल्या. हैदराबादला चौथा धक्का १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बसला. नितीश रेड्डीने १०चेंडूत १३ धावा केल्या. हर्षित राणाने त्याची विकेट घेतली. त्यानंतर ११ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आणखी एक विकेट पडली. ही विकेट होती एडन मार्करामची. या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने २३ चेंडूत २०धावा केल्या. पुढच्याच षटकात शाहबाज अहमदनेही आपली विकेट गमावली.

शाहबाज अहमदने ७ चेंडूत ८ धावांची खेळी खेळली. वरुण चक्रवर्तीने त्याला आपला बळी बनवले. अब्दुल समद १३ व्या षटकात ४ धावा काढून तंबूत परतला. आंद्रे रसेलने त्याला गुरबाजकरवी झेलबाद केले. १५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हर्षित राणाने हेनरिक क्लासेनला बोल्ड केले. त्याने १७ चेंडूत १६ धावा केल्या.

मिचेल स्टार्कने कमालीची गोलंदाजी केली. स्टार्कने ४.७ च्या इकॉनॉमीने ३ षटके टाकली आणि १४ धावांत २ बळी घेतले. आंद्रे रसेलने २.३ षटकात ७.६ च्या इकॉनॉमीसह १९ धावा दिल्या आणि ३ बळी घेतले. हर्षित राणाने ४ षटके टाकली आणि ६ च्या इकॉनॉमीसह २४ धावांत २ बळी घेतले. त्यांच्याशिवाय वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT