ipl 2024 deaf hard-of-hearing and visually-impaired fans can also enjoy the ipl match star sports lauched the new feature  yandex
Sports

IPL 2024: पहिल्यांदाच दिव्यांगानाही घेता येणार IPL ची मजा! जाणून घ्या कशी

Sign Language Feed & Descriptive Commentary In IPL: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

Ankush Dhavre

IPL 2024 Broadcasting:

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी स्टार स्पोर्ट्सकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आहे. दरवेळी या स्पर्धेत काहीतरी नवीन पाहायला मिळत असतं. यावेळी ही स्पर्धा क्रिकेट फॅन्ससाठी अतिशय खास असणार आहे. या स्पर्धेतील सामने स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत. नव्या टेक्नॉलजीसह या स्पर्धेचा आंनद दिव्यांगानाही घेता येणार आहे.

दिव्यांगासाठी स्टार स्पोर्ट्सची खास सोय..

ज्यांना ऐकू येत नाही, जे पाहू शकत नाही अशांना देखील क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. आगामी स्पर्धेत ऐकू न शकणाऱ्या आणि दृष्टिहीन क्रिकेट फॅन्ससाठी भाषा फिड आणि वर्णनात्मक समालोचनाची सोय केली आहे. त्यामुळे आता सर्वांनात आयपीएल स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.

क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात..

आजपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहीला सामना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघांमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असून ही जबाबदारी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर सोपवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT