IPL 2024 DC vs CSK Saam Digital
Sports

IPL 2024 DC vs CSK : अखेरच्या क्षणी धोनीची फटकेबाजी व्यर्थ, दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्जवर २० धावांनी विजय

DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सने आज सलग दोन सामने जिंकलेल्या चेन्रई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. कर्णधार पंत आणि वॉर्नरने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला १९२ धावांचा पाठलाग करताना चेन्रईने 171 धावा केल्या.

Sandeep Gawade

IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings

दिल्ली कॅपिटल्सने आज सलग दोन सामने जिंकलेल्या चेन्रई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. कर्णधार पंत आणि वॉर्नरने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला १९२ धावांचा पाठलाग करताना चेन्रईने 171 धावा केल्या. चेन्नईने चांगली सुरुवात केली, मात्र मधल्या फळीतील फलदाजांना मोठी खेळी करता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवला असला तरी शेवटच्या शटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे महेद्रसिंग धोनीने चाहत्यांची मने जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने १९१ धावांचं केल्या आणि १९२ धावांचं लक्ष्य चेन्नईसमोर ठेवलं होतं. दिल्लीच्या संघाकडून मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार पंत आणि वॉर्नरने मोठी भूमिका बजावली. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती, पण मधल्या षटकांमध्ये थोडी संथ खेळी झाली. मात्र नंतर दिल्लीच्या फलंदाजांनी डाव सावरला आणि १९१ धावांपर्यंत मजल मारली.

खलील अहमद आणि मुकेश कुमारच्या शानदार गोलंदाजीने चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. मध्यला फळीतील फलंदाजांना स्वस्तात तंबूत धाडलं. चेन्नईला १२ चेंडूत ४६ धावांची गरज असताना धोनी आणि जडेजा मैदानात होते. पण मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करत एकही बाऊंड्री दिली नाही. गुरू शिष्यच्या या सामन्यात शिष्य ऋषभ पंतने बाजी मारली. धोनीने शानदार खेळी करत आजही तो तितकाच फिट असल्याचं दाखवून दिलं.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली आणि डेव्हिड वॉर्नरने वेगवान सुरुवात केली. त्याचवेळी या मोसमात पहिल्यांदाच खेळणाऱ्या पृथ्वी शॉने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६२ धावा जोडल्या होत्या. लवकरच त्याने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर 10व्या आणि 11व्या षटकात दोन्ही फलंदाज बाद झाले. 15व्या षटकात मॅटिशा पतिरानाने सलग 3 चेंडूत मिचेल मार्श आणि ट्रिस्टन स्टब्सला तुफानी यॉर्कर टाकले. अशा स्थितीत दिल्लीला मोठी धावसंख्या गाठणे कठीण होते, पण अखेर कर्णधार ऋषभ पंतने आपली जादू दाखवत अवघ्या 31 चेंडूत अर्धशतक झळकावले. या जोरावर दिल्लीने 5 गडी गमावून 191 धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail changes: नखांमध्ये हे 5 बदल दिसले तर समजा नसांमध्ये भरलंय वाईट कोलेस्ट्रॉल; चुकूनही दुर्लक्ष करू नका

Post Office Scheme : एक लाख गुंतवा अन् व्याजातून ₹४४,९९५ मिळवा; पोस्टाच्या भन्नाट योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

... तर मुंबईत ठाकरेंचा महापौर होणार? 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, वाचा नेमकं गणित

Maharashtra Live News Update: बाळा भेगडेंना भाजपमध्ये कोण विचारतं? - शेळके

Skincare Tips For Woman: महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी? चमकदार त्वचेसाठी फॉलो करा या 5 टिप्स

SCROLL FOR NEXT