आयपीएल २०२४ च्या १७ व्या हंगामातील १३ सामना सीएसके म्हणजेच चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला या सामन्यात दिल्ली संघाने चेन्नईला २१ धावांनी मात दिली. या सामन्यात सीएसके पराभूत झाली असली तरी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने चेन्नईने सर्वांची मने जिंकली. खासकरून धोनीची फलंदाजी आणि पाथिरानाची गोलंदाजी.या सर्वामध्य पाथिरानाने घेतलेला झेल हा अविश्वसनीय,अस्मरणीय असा आहे.(Latest News)
दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीकडून सलामीसाठी पृथ्वी शॉ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नर मैदानात उतरले.डेव्हिड वॉर्नरने परत एकदा आपला कमाल दाखवत अर्धशतक ठोकलं.परंतु मूळ श्रीलंकेचा क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत असलेल्या पाथिरानाने झेल घेत, वॉर्नरच्या सुपरफास्ट खेळीला ब्रेक लावला.
पाथिरानाने घेतलेला झेल अशक्य झेल होता. त्याने हवेत सूर मारत वॉर्नरचा कॅच पकडला.पाथिरानाने कॅच पाहून संपूर्ण स्टेडियम आश्चर्यचकित झालं.पाथिरानाची फिल्डिंग पाहून माही म्हणजे एम एस धोनी सुद्धा आवाक झाला. धोनीने टाळ्या वाजवत पाथिरानाचे अभिनंदन केले.
या सामन्यात डेव्हिड वॉर्नर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्यानेही दिल्लीसाठी अप्रतिम खेळी खेळली. या सामन्यात डेव्हिडने ३५ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली. वॉर्नर ५२ धावांवर फलंदाजी करत असताना त्याच्यासमोर मुस्तफिझूर गोलंदाजी करत होता. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने पाथीरानाच्या डोक्यावरून चौकार मारण्याचा प्रयत्न केला पण पाथिरानाने अप्रतिम झेल घेत वॉर्नरचा डाव संपवला. डेव्हिड वॉर्नरने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ३ शानदार षटकार मारले.
दरम्यान पाथिरानाच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. डेव्हिड वॉर्नर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सर्कलच्या आत असलेल्या ज्यूनिअर मलिंगा म्हणजेच मथिशा पाथिरानाकडे जातो.चेंडू त्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून पाथिरानाने शरीराच्या एका बाजून लांब डाईव्ह टाकला आणि हवेत असताना एका हाताने अप्रतिम झेल घेतला.
या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नावावर एक खास कामगिरीही नोंदवण्यात आलीय. त्यानंतर वॉर्नर विराट कोहली आणि शिखर धवनच्या खास क्लबमध्ये सामील झालाय. डेव्हिड वॉर्नरनेही या सामन्यात आयपीएलच्या ६५०० धावा पूर्ण केल्या. डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात 25 धावा करत ६५०० धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये इतक्या धावा करणारा वॉर्नर तिसरा फलंदाज ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.