ipl 2024 csk vs dc match ipl points table update after chennai super kings vs delhi capitals match  twitter
क्रीडा

IPL 2024 Points Table: दिल्लीच्या विजयाने KKR चा फायदा! CSK चं टेन्शन वाढलं! पाहा पॉइंट्स टेबल

IPL 2024 Points Table News: दिल्ली कॅपिटल्स संघाचा या हंगामातील पहिलाच विजय आहे. दरम्यान या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.

Ankush Dhavre

CSK vs DC IPL 2024, Points Table:

आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्लीने २० षटक अखेर १९१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग चेन्नईला अवघ्या १७१ धावांवर समाधान मानावं लागलं. यासह चेन्नईने हा सामना २० धावांनी गमावला. हा चेन्नईचा या हंगामातील पहिलाच पराभव आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाचा या हंगामातील पहिलाच विजय आहे. दरम्यान या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.

दिल्ली आणि चेन्नईची रँकिंग बदलली?

या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी सरकला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोघांचेही प्रत्येकी ४-४ गुण आहेत. मात्र नेट रनरेटमुळे कोलकाताचा संघ पुढे आहे. तर आपला पहिलाच सामना जिंकणारा दिल्लीचा संघ नवव्या स्थानावरून सातव्या स्थानी पोहोचला आहे. (Cricket news in marathi)

कोणता संघ कितव्या स्थानी?

चेन्नईच्या पराभवाचा कोलकाता नाईट रायडर्स संघाला फायदा झाला आहे. हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तर चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत गुजरात टायटन्सने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर पराभूत झालेला सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे २ गुण आहेत. गुणतालिकेत लखनऊचा संघ सहाव्या स्थानी आहे. या यादीत पंजाब किंग्जचा संघ आठव्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ नवव्या स्थानी आहे. सलग २ सामने गमावणारा मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT