Chennai Super Kings vs Rajasthan Royals  X IPL
क्रीडा

IPL 2024 CSK vs RR: आयपीएलमध्ये CSKचं आव्हान कायम; प्लेऑफमधील एंट्रीसाठी राजस्थान वेटिंगवर

Bharat Jadhav

आयपीएलचा ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये झालाय. हा सामना दोन्ही संघांमधील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत आयपीएलच्या स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. राजस्थानच्या संघाने दिलेलं १४२ धावांचे आव्हान सीएसकेने ५ विकेट राखत पार केलं. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाने दिलेलं १४२ धावांचे आव्हान सीएसकेने १८.२ षटकांमध्ये ५ विकेट राखत पार केलं.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने २० षटकांत ५ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. राजस्थानकडून सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. जयस्वालने २१ चेंडूमध्ये २४ धावा केल्या तर बटलरने मात्र २१ धावा केल्या. त्यानतंर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संजू सॅमसनने १५ धावा केल्या.

रियान परागने संघासाठी शानदार फलंदाजी करत ४७ धावांची खेळी केली. ध्रुव जुरेलने १८ चेंडूत २८ धावा केल्या. अशा प्रकारे राजस्थानने २० षटकांत एकूण १४१ धावा केल्या. सीएसकेसाठी सिमरजीत सिंगने शानदार गोलंदाजी करत एकूण ३ बळी घेतले. सिमरजीतने जयस्वाल, जॉस बटलर आणि संजू सॅमसनला बाद करत माघारी तंबूत पाठवलं. यासह तुषार देशपांडेनेही २ गडी बाद केलं. तुषार देशपांडेने ध्रुव जुरेल, आणि शुभम दुबे यांना बाद केलं.

राजस्थानने दिलेलं आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने चांगली सुरुवात केली. रचिन रविंद्रने चांगली फलंदाजी केली. रचिनने १८ चेंडूमध्ये २७ धावा केल्या. कर्णधारपदाची धुरा सांभाळत ऋतुराज गायकवाडने ४२ धावांची खेळी केली. एका बाजूने डाव लढा चालू ठेवत त्याने चेन्नईला विजय मिळवून दिला. त्यानंतर डेरिल मिशेल २२ धावा करून बाद झाला. चहलने मिशेलला पायचीत बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या समीर रिझवीने १५ धावा केल्या. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने या स्पर्धेत १४ पॉईंट्स मिळवलेत. चेन्नई आता १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT