CSK vs KKR, IPL 2024: x ipl
Sports

IPL 2024: केकेआरचा विजय रथ रोखला! चेन्नईच्या शानदार विजयानं Points Table मध्ये हैदराबादची गच्छंती

CSK vs KKR, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झाला. हा सामना चेन्नईने ७ विकेट राखत जिंकलाय.

Bharat Jadhav

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये झाला. यात सीएसकेने ७ विकेट राखत विजय मिळवला. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या स्टेडियमवर कोलकाताने २० षटकांत ९ गडी गमावत १३७ धावा केल्या. यामुळे चेन्नईला विजयासाठी १३८ धावा करायच्या होत्या. कोलकताने दिलेलं आव्हान सीएसकेने ३ विकेट गमावत १७.४ षटकात १४१ धावा करत पूर्ण केलं. चेन्नईच्या विजयाने पॉइंट टेबलमध्ये सनराइजर्स हैदराबादची गच्छंती झालीय.(Latest News)

ऋतुराज गायकवाडने कर्णधार म्हणून चेन्नईसाठी पहिले अर्धशतक झळकावले. ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूमध्ये ६७ धावांची नाबाद खेळी केली. तर शिवम दुबेने २८ धावा केल्या. त्यानंतर डेरेल मिचेलने २५ धावा केल्या. तसेच रचिन रविंद्रने १५ धावांचे योगदान सीएसकेसाठी दिलं. दरम्यान फलंदाजीसह केकेआरची गोलंदाजी ही या सामन्यात अपयशी ठरली. केकेआरकडून वैभव अरोडाने २ आणि सुनिल नारायणने एक बळी घेतला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकला त्यानंतर कर्णधार ऋतुराजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सचा संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण देणं सीएसकेच्या पथ्यावर पडलं. सीएसकेच्या रविंद्र जडेजा आणि तुषार देशंपाडेच्या गोलंदाजीसमोर कोलकाताची फलंदाजी कुचकामी ठरली. जडेजाने ४ षटक टाकत १८ धावा दिल्या आणि ३ गडी बाद केले. तर तुषार देशंपाडेने ३३ धावा देत ३ गडी बाद केले. सीएसकेने पहिल्या चेंडूपासून केकेआरवर आपला दबाव ठेवत अखेरच्या धावापर्यंत चेन्नईने केकेआरला खेळात पुनरागमन करू दिलं नाही.

या विजयानंतरही चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात आता ६ गुण आहेत. चेन्नईचा नेट रन रेट सुधारला आहे. त्याचा निव्वळ रन रेट आता +. ६६६ आहे. दुसरीकडे, पराभवानंतरही कोलकाता संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. केकेआरचे ४ सामन्यांत ६ गुण आहेत. त्याचा निव्वळ रनरेट +१.५२८ आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ ४ सामन्यांत ८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

SCROLL FOR NEXT