pat cummins google
Sports

IPL Auction 2024: इतिहास घडला! Pat Cummins ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; लागली विक्रमी बोली

Pat Cummins IPL 2024 Auction: आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा दुबईत सुरु आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी बोली लागली आहे.

Ankush Dhavre

Pat Cummins Becomes Most Expensive Player In IPL History:

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा दुबईत सुरु आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी बोली लागली आहे. सनरायझर्स हैदाराबाद संघाने त्याला २०.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

सनरायझर्सने लावली विक्रमी बोली..

पॅट कमिन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या लिलावात येण्यापूर्वीच असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता,की पॅट कमिन्सवर मोठी बोली लागणार. हा अंदाज खरा ठरलाय. (Latest sports updates)

पॅट कमिन्सची मुळ किंमत २ कोटी रुपये इतकी होती. पॅट कमिन्सला आपल्या संघात स्थान देण्यासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी मुंबईने बोली लावणं सोडलं. मात्र हैदराबाद आणि बंगळुरु यांनी बोली लावणं सुरुच ठेवलं. शेवटी २० कोटींची बोली लागल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने माघार घेतली आणि पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद संघात दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT