ipl 2024 andy flower appointed as new head coach of royal challengers bangaluru sanjay bangar mike hesson saam tv
Sports

IPL 2024: RCB चं IPL ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार! इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाची हेड कोच म्हणून केली निवड

Andy Flower RCB New Coach: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मोठी घोषणा केली आहे. या संघाला नविन हेड कोच मिळाला आहे.

Ankush Dhavre

Royal Challengers Bangaluru New Head Coach:

आयपीएल स्पर्धेतील फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मोठी घोषणा केली आहे. या संघाला नविन हेड कोच मिळाला आहे. माईक हेसन आणि संजय बांगर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अँडी फ्लॉवर यांची हेड कोच म्हणून निवड केली आहे. अँडी फ्लॉवर हे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मोहम्मद रिजवानच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

इंग्लंडला बनवलं होतं टी-२० वर्ल्ड चॅम्पियन...

अँडी फ्लॉवर यांना प्रशिक्षण देण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी गेली १० ते १५ वर्षे आंतरराष्ट्रीय संघांना आणि फ्रँचायझींना प्रशिक्षण दिले आहे. अँडी फ्लॉवर यांना पाकिस्तान सुपर लीग, द हंड्रेड, आयएल टी-२० आणि टी-१० स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे.

त्यांच्या प्रशिक्षणाखाली खेळताना इंग्लंड संघाने २०१० टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाला गणसणी घातली होती. इतकेच नव्हे तर इंग्लंडचा संघ कसोटी क्रमवारीत देखील अव्वल स्थानी पोहोचला होता.

अशी राहिली कारकिर्द...

अँडी फ्लॉवर यांनी ६३ कसोटी सामन्यांमध्ये १२ शतके झळकावली होती. यादरम्यान त्यांनी ५१.५४ च्या सरासरीने ४७९४ धावा केल्या होत्या. तर २१४ वनडे सामन्यांमध्ये त्यांनी ६७८६ धावा केल्या होत्या.

यादरम्यान त्यांनी ४ शतके झळकावली होती. गेल्या ४ वर्षांपासून माईक हेसन आणि संजय भांगर हे आरसीबी संघाचा भाग होते. आता फ्रँचायझीने करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा संपणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ स्टार खेळाडूंनी सजलेला संघ असतोय मात्र या संघाला अजुनपर्यंत एकदाही जेतेपद मिळवता आले नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २०१६ मध्ये आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

मात्र या सामन्यात डेव्हीड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा परभव केला होता. आता अँडी फ्लॉवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुर्ण करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT