ipl winning prize saam tv
Sports

IPL 2023 Prize Money: विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडूंवरही होणार पैशांचा वर्षाव, जाणून घ्या बक्षीसांची रक्कम

CSK vs GT Final 2023,Prize Money: आयपीएल जिंकणाऱ्या संघाला आणि पुरस्कार विजेत्या खेळाडूंना कोट्यावधींची बक्षिसे देखील दिली जाणार आहेत.

Ankush Dhavre

CSK VS GT,IPL 2023: ज्या क्षणाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. आज आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकून पाचवे जेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाला सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उचलण्याची संधी असणार आहे. दरम्यान आयपीएल जिंकणाऱ्या संघाला आणि पुरस्कार विजेत्या खेळाडूंना कोट्यावधींची बक्षिसे देखील दिली जाणार आहेत.

कुणाला किती रक्कम मिळणार?

विजेता संघ : चेन्नई सुपर किंग्ज / गुजरात टायटन्स

२० कोटी रुपये

उपविजेता संघ : चेन्नई सुपर किंग्ज/ गुजरात टायटन्स

१३ कोटी रुपये

तिसऱ्या क्रमांकावरील संघ -मुंबई इंडियन्स - ७ कोटी रुपये

चौथ्या क्रमांकावरील संघ - लखनऊ सुपर जायंट्स - ६.५ कोटी रुपये

पर्पल कॅप विजेता खेळाडू - १५ लाख रुपये

ऑरेंज कॅप विजेता खेळाडू - १५ लाख रुपये

सुपर स्ट्रायकर - १५ लाख रुपये

पावर प्लेअर - १२ लाख रुपये

मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर -१२ लाख रुपये

गेम चेंजर - १२ लाख रुपये

एमर्जिंग प्लेअर - २० लाख रुपये

कॅच ऑफ द सिरीज -१२ लाख रुपये

अंतिम सामन्यातील सामनावीर - ५ लाख रुपये. (Latest sports updates)

कोण होणार विजेता? (CSK vs GT Match Prediction)

चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर गुजरात टायटन्स संघाने क्वालिफायर २ च्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे.

दोन्ही संघांचा आतापर्यंतचा जर रेकॉर्ड पाहिला तर गुजरात टायटन्स संघ चेन्नई सुपर किंग्ज संघावर भारी पडला आहे. या संघाने ४ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT