Ruturaj Gaikwad  Twitter IPL
Sports

IPL 2023 Orange Cap List: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय फलंदाजांचा दबदबा; ऋतुराज अव्वल स्थानी तर हे आहेत टॉप 5 फलंदाज

Most Runs In IPL This Year: कोण आहेत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेले फलंदाज, जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL 2023 Orange Cap Updated List: आयपीएल २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत ८ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. काही सामने २०० धावांच्या पार गेले आहेत.

तर काही सामने एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यांमध्ये फलंदाजांकडून तुफान फटकेबाजी केल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

कोण आहेत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेले फलंदाज, जाणून घ्या.

ऋतुराज गायकवाड:

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड गेले काही दिवस दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. मात्र त्याने आयपीएल २०२३ स्पर्धेतून जोरदार कमबॅक केले आहे.

पहिल्याच सामन्यात त्याने ९२ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात देखील त्याने अर्धशतक झळकावले होते. या खेळीच्या जोरावर त्याने २ सामन्यांमध्ये १४९ धावा केल्या आहेत.

काईल मेयर्स:

वेस्ट इंडिज संघातील आक्रमक फलंदाज काईल मेयर्स सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी खेळणाऱ्या काईल मेयर्सने या स्पर्धेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत १२६ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानी आहे. (Latest Sports Updates)

शिखर धवन:

गब्बर इज बॅक म्हणत शिखर धवनने आयपीएल स्पर्धेतून जोरदार कमबॅक केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिखर धवन भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता येत नव्हती. आता आयपीएलच्या सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने देखील काईल मेयर्सची बरोबरी करत १२६ धावा केल्या आहेत.

संजू सॅमसन:

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन हा देखील सध्या तुफान कामगिरी करतोय. जेव्हा जेव्हा राजस्थान रॉयल्स संघ अडचणीत असतो त्यावेळी संजू सॅमसन संकटमोचक बनून संघाला मदत करण्यासाठी धाव घेत असतो. या हंगामात देखील त्याला चांगली सुरुवात मिळाली आहे. त्याने सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये १७० च्या स्ट्राईक रेटने ९७ धावा केल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर:

एकीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचे फलंदाज फ्लॉप ठरत असताना, डेव्हीड वॉर्नर हा संघासाठी धावा करताना दिसून येत आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी २ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ९३ धावा केल्या आहेत. यादरम्यान ५६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT