M S Dhoni Saam TV
Sports

MS Dhoni Injury Viral Video: धोनीच्या पायाला गंभीर दुखापत? CSK फॅन्सचं टेन्शन वाढवणारा VIDEO आला समोर

MS Dhoni Video : धोनी प्रॅक्टिस सेशनदरम्यान लंगडत चालत असल्याचं बोललं जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 News : चेन्नई सुपर किंग्सला सोळावा सीजन सुरु होण्याआधीच मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. कारण चेन्नई सुपर किग्सचा हुकमी एक्का कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दुखापत झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

धोनी प्रॅक्टिस सेशनदरम्यान लंगडत चालत असल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, धोनीच्या डाव्या पायाला दुखापत झाली असावी. मात्र खरंच धोनी दुखापतग्रस्त असेल तर मात्र चेन्नई संघाचं टेन्शन वाढणार, हे नक्की.

स्टार स्पोर्ट्सनुसार, धोनी ज्यावेळी प्रॅक्टिस सेशनसाठी मेदानात उतरला त्यावेळी तो लंगडताना दिसत होता. प्रॅक्टिससाठी धोनी फार उत्साही देखील नव्हता. मैदानात चालत जातानाही तो सांभाळून पावलं टाकताना दिसला. धोनीला दुखापत झाली की नाही, अद्याप तरी स्पष्ट नाही. Latest sports updates)

प्रॅक्टिस सेशन देखील चेन्नई आणि धोनीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी दिसली. धोनी मैदानात उतरताच फॅन्सचा उत्साह द्विगुणित झाल्याचं दिसलं.

CSK चं नेतृत्व कोण करणार?

धोनी खरंच दुखापतग्रस्त असेल तर संघांच नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. रविंद्र जडेजाचं नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मात्र मागील सीजनमध्ये जडेजाला सीएसकेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. जडेजाच्या नेतृत्वात संघांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. त्यामुळे संघ व्यवस्थापन बेन स्टोक्स आणि ऋतुराज गायकवाड यांचा देखील कर्णधार म्हणून विचार करु शकतात.

धोनीचा शेवटचा IPL सीजन असण्याची शक्यता

धोनी सध्या ४१ वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर गेली अनेक वर्ष धोनी IPL खेळत आहे. मात्र यावर्षी धोनी निवृत्ती जाहीर करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. चेपॉकच्या मैदानावर तो चाहत्यांचे आभार मानून निवृत्त होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT