Rohit Sharma SAAM TV
Sports

IPL 2023, MI vs GT: मुंबईची कामगिरी दमदार, तरी फॅन्स गपगार; रोहितमुळे मुंबई इंडियन्सची घाबरगुंडी!

IPL 2023, MI vs GT: मुंबईच्या विजयामुळे फॅन्स आनंदी आहे. मात्र काही आकड्यांवर नजर टाकली तर फॅन्सची चिंता नक्की वाढेल

प्रविण वाकचौरे

IPL 2023, MI Win: मुंबई इंडियन्सने पहिल्या एलिमिनेटर सामन्यात मोठ्या फरकारने  लखनऊ सुपर जायंट्स पराभूत केलं. या विजयानंतर आता मुंबई इंडियन्स दुसऱ्या एलिमिनेटस सामन्यात गुजरात टायटन्ससोबत भिडणार आहे. येत्या 26 मे रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. एकाकडे मुंबईच्या विजयामुळे फॅन्स आनंदी आहे. मात्र काही आकड्यांवर नजर टाकली तर फॅन्सची चिंता नक्की वाढेल.

रोहितची कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र यंदाच्या सीजनमध्ये त्याची बॅट शांत आहे. अनेक सीजन गाजवलेला रोहित यंदाच्या सीजनमध्ये धावांसाठी तरसताना दिसत आहे. लखनौविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही रोहित 10 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. या सीजनमधील त्याची कामगिरी त्याच्या नावाला साजेशी नाही. काही सामन्यांमध्ये तो चमकला मात्र ते सातत्या त्याला टिकवता आलेला नाही. ही गोष्ट मुंबईच्या फॅन्सची काळजी वाढवणारी आहे.

रोहित शर्मा आणि प्ले ऑफ

रोहित शर्मा मुंबईचा भरवशाचा खेळाडू असता तरी प्ले ऑफमधील त्याची कारगिरी टीमसाठी अजिबात भरवशाची नाही. कारण प्लेऑफमधील (फायनल वगळता) एकूण 14 सामन्यात रोहितना 9.61 च्या सरासरीने 125 धावा केल्या आहे. रोहितची ही कामगिरी मुंबईसाठी अनुकून नाही.

रोहितने या मोसमात 15 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 21.60 च्या सरासरीने 324 धावा केल्या आहेत. तर दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 65 धावा आहे. (Latest sports updates)

हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स

दुसरीकडे, हार्दिक पांड्या रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्ससोबत बराच काळ खेळला आहे. हार्दिकला मुंबई आणि रोहितच्या उणिवा देखील माहिती आहेत. कमतरता माहित आहेत. मुंबईची बॅटिंग ऑर्डर नेस्तनाबूत करण्यासाठी गुजरातकडे रशीद खान आणि नूर अहमद हे दोन आश्वासक लेगस्पिनर देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT