KKR In IPL 2023/Twitter SAAM TV
Sports

KKR In IPL 2023 : सिंह गेला, पण वाघ आला... कोलकाता संघात श्रेयस अय्यरच्या जागी 'रॉय'ल खेळाडूची एन्ट्री

Jason Roy : कोलकाताने जेसन रॉयला त्याच्या बेस प्राइस दीड कोटीपेक्षा जास्त पैसे मोजून म्हणजेच २.८० कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात घेतले आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

Nandkumar Joshi

Jason Roy In Kolkata Knight Riders : दुखापतीमुळं नियमित कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमधूनच बाहेर झाल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघात कोणाची एन्ट्री होणार? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. कोलकाता संघानं जेसन रॉयला संघात घेतलं आहे.

कोलकाताने जेसन रॉयला (Jason Roy) त्याच्या बेस प्राइस दीड कोटीपेक्षा जास्त पैसे मोजून म्हणजेच २.८० कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात घेतले आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याची जागा आता जेसन रॉय घेणार आहे. (Latest sports updates)

पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर संपूर्ण आयपीएल स्पर्धेला मुकला आहे. कोलकातासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. अय्यरवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे, असे सांगितले जाते. याशिवाय बांगलादेशचा हरफनमौला खेळाडू शाकिब यंदाच्या आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाही.

इंग्लंड क्रिकेट संघातील विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा जेसन रॉय आतापर्यंत आयपीएलचे १३ सामने खेळला आहे. त्याने ३० च्या सरासरीने आणि १२३.९६ च्या स्ट्राइक रेटने ३२९ धावा केल्या आहेत. याआधी २०२१ मध्ये जेसन हा सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला होता.

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघातील जखमी खेळाडूंची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाची डोकेदुखी वाढली आहे. त्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाला अनेक झटके बसले आहेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, तर अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: ४ वेळा आमदार राहिलो आता बस झालंं; महायुतीच्या मंत्र्याकडून निवृत्तीचे संकेत|VIDEO

Maharashtra Weather: अवकाळीचा तडाखा! मुंबईसह राज्यात पावसाचे तांडव, पुढील चार दिवस महत्त्वाचे, वाचा IMD चा अंदाज

Dnyanda Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी, दिसते चंद्राची कोर साजरी

Maharashtra Live News Update: महानुभावांचा कुंभमेळा नाशिकमध्ये घ्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? टोकाचं पाऊल उचलण्यामागचं धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT