Ankush Dhavre
आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.
ख्रिस गेल हा या स्पर्धेतील सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे.
मात्र आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज कोण यावर एक नजर टाकूया.
डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज शिखर धवनने या स्पर्धेत ७०१ चौकार मारले आहेत.
आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली ५७८ चौकारांसह दुसऱ्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ५७७ चौकार मारले आहेत.
भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने ५१९ चौकार मारले आहेत.
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने ५०६ चौकार मारले आहेत.