KKR vs RR Match Updates Saam TV
Sports

KKR vs RR Match Updates: युजवेंद्र चहलने घेतली कोलकाताची फिरकी; राजस्थानला विजयासाठी १५० धावांचे लक्ष

KKR vs RR Match Updates: राजस्थानकडून युजवेंद्र चहलने भेदक मारा केला. त्याच्या जादुई फिरकी गोलंदाजीपुढे कोलकाताचे फलंदाज निष्प्रभ ठरले. चहलने ४ विकेट्स घेतल्या.

Satish Daud

KKR vs RR Match Updates: आयपीएलच्या ५६ व्या सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ईडन गार्डन्सवर सामना सुरू आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने भेदक मारा केला. त्याच्या जादुई फिरकी गोलंदाजीपुढे कोलकाताचे फलंदाज निष्प्रभ ठरले. चहलने ४ विकेट्स घेतल्या.

ईडन गार्डन मैदानावर प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याची सुरुवात अतिशय खराब झाली. जेसन रॉय याला बोल्टने स्वस्तात तंबूत धाडले. जेसन रॉय याला १० दहा धावांचे योगदान देता आले. रॉयपाठोपाठ गुरबाजही लगेच तंबूत गेला. गुरबाजलाही बोल्टने बाद केले. गुरबादने १८ धावांचे योगदान दिले.

कोलकात्याचे आरआरआर आज फ्लॉप गेले. कर्णधार राणा याला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राणा याने १७ चेंडूत २२ धावांचे योगदान दिले. तर रसेल याने १० चेंडूत १० धावा केल्या. यामध्ये एक षटकार लगावला.

रिंकू याला करिष्मा दाखवता आला नाही. रिंकू १६ धावांवर तंबूत परतला. या खेळीत त्याने एक षटकार लगावला. आघाडीची फळी फ्लॉप गेल्यानंतर मध्यक्रम आणि तळाची फलंदाजीही ढेपाळली. शार्दूल ठाकूर, अनुकूल रॉय आणि सुनील नारायण यांना मोठी खेळी करता आली नाही. शार्दूल ठाकूर याला अवघ्या एका धावेचे योगदान देता आले.

एका बाजूला विकेट्स पडत असताना, वेंकटेश अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ४२ चेंडूत ५७ धावा कुटल्या. वेकंटेश अय्यरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या करता आली नाही. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले. संदीप शर्मा आणि के.एम. आसिफ यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT