IPL 2023 Gujarat Titans Saam TV
Sports

Gujarat Titans : हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं; IPL 2023 आधीच हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूला दुखापत

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी आहे.

Satish Daud

IPL 2023 Gujarat Titans : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी सलामीचा सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. पण आयपीएल सुरू होण्यापूर्वीच हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी आहे. त्याचा मोठा खेळाडू जखमी झाला आहे. (Latest Sports Updates)

त्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.जोशुआ लिटल असे या खेळाडूचे नाव असून तो आयर्लंडकडून खेळतो. जोशुआने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. IPL 2023 च्या लिलावात जोशुआ लिटलने इतिहास रचला होता.  (Sports News)

आयपीएल लिलावात विकला जाणारा तो पहिला आयरिश खेळाडू ठरला. जोशुआ लिटलला हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने तब्बल 4.4 कोटी रुपयांना विकत घेतले. साऊथ आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. या कारणामुळे त्याने पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेतला. IPL 2023

जोशुआ पीएसएलमध्ये मुलतान सुलतान संघाकडून खेळणार होता. मात्र, आता त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. दरम्यान, जोशुआ लिटल जखमी झाल्याने गुजरात टायटन्स संघासह कर्णधार हार्दिक पांड्याचं देखील टेन्शन वाढलं आहे. तो आयपीएल खेळणार की नाही याकडेच सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

एका क्रिडा वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जोशुआ लिटल पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यातून आयर्लंड संघात पुनरागमन करू शकतो. आयर्लंडला मार्चमध्ये बांगलादेशचा दौरा करायचा आहे. 18 मार्चपासून दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यात टी-२० सामनाही होणार आहे. ही मालिका 31 मार्चला संपणार आहे. त्याच दिवशी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने आयपीएल 2023 ची सुरुवात होईल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT