KKR Twitter/ @KKR
Sports

IPL 2022: श्रेयश अय्यर KKR चा नवा कर्णधार!

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने या मोसमात आधीच दोन मोठ्या करामती केल्या आहेत.

वृत्तसंस्था

IPL 2022: केकेआरच्या संघाने आज एक मोठी घोषणा केली आहे. श्रेयश अय्यर हा कोलकाताच्या संघाचा कर्णधार असणार आहे. 2022 च्या हंगामात श्रेयश कोलकाताचं नेतृत्व करताना दिसणार आहे. आंद्रे रसेलकडे संघाचं कर्णधार पद जाण्याची शक्यता होती. परंतु लिलावात फ्रँचायझींने श्रेयश अय्यरला १२ कोटी रुपयांत विकत घेतले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने या मोसमात आधीच दोन मोठ्या करामती केल्या आहेत. पहिली म्हणजे आगामी हंगामासाठी 4 खेळाडूंना रिटेन केले आहे आणि दुसरे म्हणजे टीम इंडियाचे (Team India) गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून करारबद्ध केले आहे. केकेआरने आयपीएल लिलावापूर्वी आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी) आणि सुनील नरेन (6 कोटी) यांना रिटेन केले आहे.

लिलावात बोली लावण्यासाठी संघाकडे 48 कोटी शिल्लक होते. यापूर्वी जानेवारीमध्ये KKR ने भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. भरत अरुण हे 2014 पासून भारतीय राष्ट्रीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते आणि भारतीय संघाला नवीन उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. एक खेळाडू म्हणून त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे त्याचबरोबर तामिळनाडूसाठी ते खूप यशस्वी खेळाडू होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh: रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवरील १०० हून अधिक क्रू मेंबर्स रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं ?

Rain Update : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; बोरी नदीवरील पुलावरून पाणी, धाम प्रकल्प ओव्हरफ्लो

Maharashtra Rain Live News: पुणे मुंबईसह रायगडमध्ये पुढील तीन तास महत्वाचे

ठाणे स्टेशनच्या जिन्याला धबधब्याचं स्वरूप; पाणी वाहतानाचा VIDEO समोर, प्रवाशांची तारांबळ

Monsoon Songs: 'भिजून गेला वारा...' धो धो बरसणाऱ्या पावसात वेळ काढून ऐका ही ५ गाणी

SCROLL FOR NEXT