IPL 2022 Saam TV
क्रीडा

IPL 2022: चेन्नईला दोन वेळा चॅम्पियन बनवणारा फलंदाज दिल्लीच्या खेम्यात दाखल

वृत्तसंस्था

दिल्ली कॅपिटल्सने (DC) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) जिंकण्यासाठी संघासोबत खूप मोठे नाव जोडले आहे. दिल्लीने ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमधील दिग्गज खेळाडू शेन वॉटसन (Shane Watson) याची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे आधीच सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अजित आगरकर होता, पण या फ्रँचायझीने शेन वॉटसनलाही आपल्या प्रशिक्षक संघात स्थान दिले आहे.

शेन वॉटसन हा आयपीएलमधील मोठे नाव आहे. तो राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल विजेत्या संघासोबत खेळला आहे. शेन वॉटसनने आरसीबीकडून आयपीएल खेळला आहे, त्याचबरोबर त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून आपल्या कारकिर्दीचा शेवट केला आहे. वॉटसन 2020 मध्ये आयपीएलमधील शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याने क्रिकेटला अलविदा केला.

वॉटसनने आयपीएलमध्ये 145 सामन्यांमध्ये 3874 धावा केल्या असून 92 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. वॉटसनचे हे आकडे त्याचा अनुभव दर्शवतात. तसेच, एमएस धोनी आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंसोबत खेळल्याने त्याला क्रिकेटची चांगली जाण आहे. यामुळेच दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूचा त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आहेत. अजित आगरकर आणि शेन वॉटसन हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स आणि फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण अमरे आहेत.

''दिल्लीला चॅम्पियन बनवण्याची वेळ आली''

दिल्लीची चॅम्पियन होण्याची वेळ आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने कधीही आयपीएलचे विजेतेपद जिंकले नाही, ते 2020 मध्ये अंतिम फेरीत हरले, पण शेन वॉटसनला आशा आहे की आता दिल्लीची विजेतेपदाची प्रतीक्षा संपणार आहे. शेन वॉटसनने दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'खेळाडू म्हणून माझ्या या स्पर्धेशी खूप छान आठवणी जोडल्या गेल्या आहेत आणि आता मला प्रशिक्षकाची जबाबदारी मिळाली आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ही संधी मिळाल्याने तो एक उत्तम कोच आणि कर्णधार राहिला आहे. तो जगातील सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षकांपैकी एक आहे. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळेल. मी खूप आनंदी आहे.'

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT