IPL 2022: संघांना मोठा धक्का! कोटीत घेतलेले धुरंधर राहणार काही सामने बाहेर

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या फेरीत सर्व आयपीएल फ्रँचायझींचे 26 परदेशी खेळाडू (26 Foreign Players) या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.
IPL 2022
IPL 2022Saam TV

आयपीएलचा 15वा हंगाम जोरदार धमाकेदार असणार आहे. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात दोन नवीन संघांचाही समावेश करण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) हा मोसम पूर्वीपेक्षा मोठा आणि भव्यदिव्य असणार आहे. मात्र, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये देशांतर्गत खेळाडूच वर्चस्व गाजवू शकतात.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या फेरीत सर्व आयपीएल फ्रँचायझींचे 26 परदेशी खेळाडू (26 Foreign Players) या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. आयपीएलच्या तारखा आणि परदेशी खेळाडूंच्या इतर देशांसोबतच्या मालिका यांच्या तारखा एकच आहेत. यामुळेच काही परदेशी खेळाडू त्यांच्या आयपीएल संघांच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत.

IPL 2022
छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा संकूल असे नामकरण करा : राष्ट्र विकास सेना

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (WI vs ENG)

इंग्लंड सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना २८ मार्च रोजी होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS)

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यानंतर तीन वनडे आणि एक टी-२० सामना खेळवला जाईल. कसोटी मालिका २५ मार्चला संपणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा ५ एप्रिलला संपणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (SA vs BAL)

दक्षिण आफ्रिका बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. ही एकदिवसीय मालिका २३ मार्च रोजी संपेल, तर कसोटी मालिका १२ एप्रिल रोजी संपेल.

कोणते खेळाडू राहू शकतात अनुपस्थीत?

चेन्नई सुपर किग्स (CSK)- ड्वेन प्रिटोरियस

मुंबई इंडियन्स (MI) - जोफ्रा आर्चर

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) - पॅट कमिन्स आणि अॅरॉन फिंच

राजस्थान रॉयल्स (RR)– रस्सी व्हॅन डर डसेन

सनरायझर्स हैदराबाद (SRH) - मार्को जेन्सन, शॉन अॅबॉट, एडन मार्कराम

दिल्ली कॅपिटल्स (DC) - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एनगिडी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) - जेसन बेहरेनडॉर्फ, ग्लेन मॅक्सवेल, जोश हेझलवुड

पंजाब किंग्स (PBKS) - जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, नॅथन एलिस

लखनौ सुपर जायंट्स (LSG) - मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, काइल मेयर्स, मार्क वुड, क्विंटन डी कॉक

गुजरात टायटन्स (GL) - डेव्हिड मिलर, अल्झारी जोसेफ

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com