IPL 2022: पंजाब किंग्जचा (PBKS) उपकर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आयपीएल 2022 साठी कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) फ्रँचायझीमधून बाहेर पडण्याच्या वृत्तांदरम्यान कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मयंक अग्रवाल हा पहिला खेळाडू असू शकतो. आयपीएल २०२२ मध्ये पंजाबचा संघ मोहम्मद शमी (Mohmmad Shami) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) सारख्या खेळाडूंना कायम ठेवू शकतो.
मयंक अग्रवाल
* मयंक अग्रवालने गेल्या तीन मोसमात पंजाब किंग्सकडून चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी अनुक्रमे ४४१, ४२४ आणि ३३२ धावा केल्या आहेत.
* त्याला आयपीएलमध्ये जवळपास 10 वर्षांचा अनुभव आहे.
* केएल राहुलच्या अनुपस्थितीत, तो संघाचे नेतृत्व करू शकतो आणि सलामविर म्हणून फलंदाजी देखील करु शकतो.
* त्याचा पगार फक्त 1 कोटी आहे, त्यामुळे पंजाब त्याला कायम ठेवू शकते.
मोहम्मद शमी
* मोहम्मद शमीला आयपीएलमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे.
* गेल्या तीन हंगामात त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. शमीने 58 बळी घेतले आहेत आणि डेथ ओव्हर्समध्ये तो खूप प्रभावी गोलंदाज आहे.
* या वेगवान गोलंदाजाने अनेक वेळा संघाला विकेट मिळवून दिल्या आहेत.
* त्याचा अनुभव संघाला खूप कामी येऊ शकतो. कारण तो गोलंदाजीत प्रमुख भूमिकेत बाकीच्या गोलंदाजांना चांगले मार्गदर्शन करु शकतो.
* आयपीएलमधील मोहम्मद शमीचा पगार ४.८ कोटी आहे.
रवी बिश्नोई
* रवी बिश्नोई पंजाब किंग्ज संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे.
* संघासाठी बिश्नोईने सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये नेहमीच यश मिळवून दिले आहे.
* आयपीएल 2021 मध्ये त्याने 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. त्याने अवघ्या दोन मोसमात 24 विकेट्स घेतल्या आहेत.
* रवी बिश्नोईचा पगार केवळ 2 कोटी आहे, त्यामुळे संघ त्याला कायम ठेवू शकतो.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.